solanine and lycopene in tomato can cause joint pain kidney disease
सावधान! जास्त टोमॅटो खाल्ल्याने वाढते सांधेदुखी, चालणं होतं अवघड; 'या' समस्यांचा धोका By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2024 1:15 PM1 / 8टोमॅटो ही एक अशी भाजी आहे जी अनेक खाद्यपदार्थांची चव वाढवतं. टोमॅटोचं महत्त्व आता इतकं वाढलं आहे की, जेव्हा ते महाग झाले तेव्हा लोकांच्या पदार्थांची चव बिघडू शकते. काही लोकांना तो नुसताही खायला आवडतो. 2 / 8टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, फॉस्फरस, कॅल्शियम आणि पोटॅशियमसारखे महत्त्वाचे पोषक घटक आहेत जे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. भारतातील लोकप्रिय न्यूट्रीशनिस्ट निखिल वत्स यांनी झी न्यूजला याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. 3 / 8कोणत्याही आरोग्यदायी गोष्टीचे फायदे आणि तोटे दोन्ही असू शकतात, त्यामुळेच एका मर्यादेपेक्षा जास्त पौष्टिक अन्नही न खाण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. 4 / 8टोमॅटोचा गुणधर्म एसिडिक असतो आणि त्यात सोलेनाईन आणि लायकोपीन देखील असतं, ज्याचं प्रमाण वाढल्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. जास्त टोमॅटो खाण्याचे तोटे काय आहेत हे जाणून घेऊया...5 / 8टोमॅटोच्या अतिसेवनाने सांधेदुखी होऊ शकते, कारण यामध्ये सोलेनाईन नावाचा अल्कलॉइड असतो, ज्यामुळे सांध्यामध्ये वेदना आणि सूज येऊ शकते. त्यामुळे सांधेदुखीसारख्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांनी टोमॅटो कमी प्रमाणात खावे.6 / 8टोमॅटो ही पचनासाठी उत्कृष्ट भाजी मानली जाते, परंतु जर तुम्ही ते एका मर्यादेपेक्षा जास्त खाल्लेत तर तुम्हाला ॲसिडिटी किंवा ॲसिड रिफ्लक्सचा त्रास होऊ शकतो. 7 / 8टोमॅटोचं स्वरूप एसिडिक आहे ज्यामुळे गॅस्ट्रोइसोफेजल रिफ्लक्सची (Gastroesophageal Reflux) समस्या वाढू शकते.8 / 8जे लोक किडनीशी संबंधित आजारांनी त्रस्त आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच टोमॅटो खावेत कारण तो पोटॅशियमचा रिच सोर्स मानला जातो, ज्यामुळे अनेक समस्या वाढू शकतात. अशा लोकांनी टोमॅटो सूप आणि टोमॅटो सॉस खाणं टाळलं पाहिजे. आणखी वाचा Subscribe to Notifications