Spinach or Palak boiled water benefits for health, you should know this
चुकूनही फेकू नका पालक उकडलेलं गरम पाणी, पानांपेक्षाही जास्त असतं फायदेशीर By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 11:27 AM1 / 7Spinach water benefits : हिवाळ्यात वेगवेगळ्या पालेभाज्या खाण्याची खूप मजा असते. या भांज्यांमुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात आणि शरीराची इम्यूनिटीही बूस्ट होते. याच भाज्यांपैकी एक म्हणजे पालक. लोक पालक वेगवेगळ्या पद्धतीने खातात. बरेच लोक पालक उकडल्यानंतर त्याचं पाणी फेकून देतात. कारण त्यांना हे माहीत नसतं की, हे पाणी पालकाच्या पानांपेक्षा जास्त फायदेशीर असतं. त्यात आरोग्याला फायदेशीर अनेक पोषक तत्व असतात. आज आम्ही तुम्हाला पालकाच्या पाण्याच्या फायद्यांबाबत सांगणार आहोत.2 / 7डोळ्यांच्या दृष्टीसाठी फायदेशीर - पालकाचं गरम पाणी डोळ्यांसाठी फायदेशीर मानलं जातं. या पाण्यात भरपूर व्हिटॅमिन ए असतं, जे डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी थेट फायदेशीर असतं. त्यासोबतच त्यात ल्यूटिन आणि जेक्साथिनसारखे अॅंटी-ऑक्सिडेंट्सही आढळतात. जे डोळ्यांच्या कोशिका मजबूत करतात.3 / 7त्वचा टाइट आणि फीट ठेवतं - पालक उकडल्यानंतर काढलेलं गरम पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन बाहेर निघू लागतं. याने चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या दूर होते. तसेच त्वचा चमकदार होते. इतकंच नाही तर या पाण्याच्या सेवनाने शरीरातील ब्लड सर्कुलेशनही चांगलं होतं.4 / 7रोगप्रतिकारक शक्ती वाढते - पालकाच्या गरम पाण्यात अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि प्रोटीनसहीत अनेक पोषक तत्व असतात. ज्याचं सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि ऑक्सिडेटिव स्ट्रेस कमी होतो.5 / 7केस होतात मजबूत आणि सुंदर - पालकाचं गरम पाणी पायल्याने डोक्यावर केसांना फार फायदा होतो. त्यात प्रोटीन आणि आयरन असतं. ज्याने केसांचं मूळ मजबूत होतं आणि ते पांढरे होण्याचा स्पीडही कमी होतो.6 / 7पोटासाठी फायदेशीर - ज्या लोकांना नेहमीच पोटात गडबड असण्याची समस्या असते, त्यांच्यासाटी पालकाचं पाणी फार फायदेशीर असतं. याच्यामुळे त्यांचं मेटाबॉल्जिम वाढतं, ज्यामुळे पोटाचं पचन तंत्र योग्यपणे काम करतं. हे पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते.7 / 7कसं प्यावं पालकाचं पाणी? - पालक उकडल्यानंतर त्याची पाने बाहेर काढा. शिल्लक राहिलेलं पाणी गाळून एका ग्लासमध्ये टाका. नंतर त्यातं काळं किंवा पांढरं मीठ टाका आणि नंतर हे पाणी चहासारखं एक एक घोट प्यावं. आणखी वाचा Subscribe to Notifications