शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Vaccine: जबरदस्त! अवघ्या ७५० रुपयांत मिळणार ‘सिंगल डोसवाली’ कोरोना लस; भारतीयांना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 9:12 AM

1 / 11
भारतात कोविड १९ विरोधी लसीकरण मोहिमेला पुढील महिन्यापासून वेग मिळण्याची शक्यता आहे. देशात उत्पादित होणाऱ्या सिंगल डोसवाली ‘स्पूतनिक लाइट’ लस सप्टेंबर महिन्यात लॉन्च होणार आहे. पनेसिया बायोटेकने अलीकडेच भारतात ड्रग्स रेग्युलेटरसमोर एक अर्ज सादर करत आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे.
2 / 11
पनेसिया आणि रशियन डायरेक्ट इनवेस्टमेंट फंड यांच्यात याआधीच भागीदारी झाली आहे. स्पूतनिक लाइट सुरुवातीला मर्यादित साठ्यात उपलब्ध होईल. त्याची किंमत ७५० रुपये असण्याचा अंदाज आहे.
3 / 11
चाचणीत ८० टक्के यशस्वी ठरली ‘स्पूतनिक लाइट’ स्पूतनिक लाइट ही लस गामलेया इन्सिट्यूटनं विकसित केली आहे. रिसर्चला RDIF ने सपोर्ट केला. मे महिन्यात या लसीला रशियात आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली होती.
4 / 11
ही लस खूप जास्त प्रभावी असल्याचं तज्त्र सांगतात. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर लसीकरणामध्ये सिंगल डोस असणाऱ्या या लसीचं महत्त्वपूर्ण योगदान असणार आहे. RDIF च्या माहितीनुसार, रशियात ट्रायल झालेल्या स्पूतनिक लाइट लस ८० टक्के प्रभावी ठरली आहे
5 / 11
आतापर्यंत दोन डोस असणारी स्पूतनिक व्ही लसीचा वापर होत होता. हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅब यांनी या स्पूतनिक लसीकरणाची जबाबदारी घेतली होती. सूत्रांच्या माहितीनुसार स्पूतनिक व्ही लसीचा तुटवडा या महिन्याच्या अखेरीस संपुष्टात येईल.
6 / 11
स्पूतनिक लस पूर्णपणे रोलआउट होल्डवर ठेवलं होतं त्यामुळे लस मिळण्यास उशीर होत होता. जुलैमध्ये पनेसिया बायोटेकनं घोषणा केली होती की, त्यांना स्पूतनिक व्ही लसीचं उत्पादन करण्याची परवानगी मिळाली आहे. हिमाचल प्रदेशच्या बद्दी येथील प्लांटमध्ये बनवलेली लस क्वालिटी चेकिंगमध्ये पास झाली आहे.
7 / 11
सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीनेही व्हॅक्सिनला ग्रीन सिग्नल दिला आहे. पनेसिया प्रत्येक वर्षी १० कोटी लस उत्पादित करणार असून डॉ रेड्डीज लोकांचं लसीकरण करणार आहेत.
8 / 11
केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील तज्ज्ञांच्या समितीनं डॉ. रेड्डीज यांना भारतात परवानगीसाठी रशियन डेटा सबमिट करण्यास मान्यता दिली होती. स्पूतनिक लाइट ही खरंतर स्पूतनिक व्ही लसीचा पहिला डोस आहे. त्यासाठी तिला परवानगी देण्यात आली आहे.
9 / 11
दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांचा आकडा तब्बल सहा दिवसांनंतर पुन्हा ४० हजारांवर पोहोचला आहे. देशात गेल्या चोवीस तासांत ४१ हजार नवे कोरोनाबाधित सापडले व आणखी ४९० जणांचा संसर्गाने मृत्यू झाला. केरळममध्ये सर्वाधिक २३५०० नवे रुग्ण आढळले असून तेथील कोरोना स्थिती आणखी चिंताजनक होण्याची शक्यता आहे.
10 / 11
कोरोनामुळे जीव गमावलेल्यांची आकडेवारी ४ लाख २९ हजार ६६९ झाली. उपचार घेत असलेल्या रुग्णांची सलग पाचव्या दिवशीही वाढली. एकूण रुग्णांच्या तुलनेत १.२१ टक्के जण उपचार घेत आहेत. ९७.४५ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले.देशात केरळमध्ये सर्वाधिक नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत.
11 / 11
अमेरिकेत कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ३ कोटींवर पोहोचली आहे. तिथे ३ कोटी ७० लाख कोरोना रुग्ण आहेत. तिथे आजवर ६ लाख ३५ हजार जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. जगात २० कोटी ५६ लाख रुग्ण असून त्यातील १८ कोटी ४५ लाख जण बरे झाले.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या