शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रात्रभर झोपल्यानंतरही दिवसा झोप येते? कारण जाणून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 11:35 AM

1 / 7
रात्रीच्या वेळी आठ ते नऊ तास झोपूनही आपल्याला दिवसा झोप येत असले तर, याकडे चुकूनही दूर्लक्ष करू नाक. जेवण आणि पाण्याबरोबरच झोपही चांगल्या प्रकृतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. माणसाला चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी किमान सात ते आठ तासांची झोप आवश्यक असते. काही लोक झोप येत नसल्याने त्रस्त असतात, तर काही लोकांना प्रमाणापेक्षा अधिक झोप येते. खरे तर या दोन्ही गोष्टी प्रकृतीसाठी योग्य नाहीत.
2 / 7
वारंवार झोप येते? - दर वेळी झोप येण्याच्या समस्येला हायपरसोमनिया (Hypersomnia) म्हटले जाते. या आजारात आपल्याला रात्री उशीरापर्यंत झोपूनही दिवसा झोप येते. याचा आपल्या दिनचर्येवर आणि कामावरही परिणाम होत असतो. अति मद्यपान, तणाव आणि नैराश्यामुळेही ही समस्या उद्भवते. ही समस्या असेसले लोक झोपेपासून सुटका मिळविण्यासाठी अनेक वेला चहा आणि कॉफीही घेतात. यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
3 / 7
झोपायची चांगली सवय लावून घेणे आवश्यक - प्रत्येक व्यक्तीसाठी सात ते आठ तासांची रात्रीची झोप आवश्यक आहे. याच बरोबर तुमची झोपेची वेळही व्यवस्थित ठेवणे अर्थात योग्य वेळी झोपने आणि योग्यवेळी उठणे आवश्यक आहे. महत्वाचे म्हणजे, झोपण्यापूर्वी सर्वांनीच टीव्ही, मोबाईल आणि लॅपटॉप सारखे डिव्हीइसेस आपल्यापासून दूर करायला हवेत.
4 / 7
हेल्दी फूड्स आवश्यक - नियमितपणे पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील ऊर्जा चांगली राहते. आपल्या आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि कार्बोहायड्रेट्सचे चांगले संतुलन असणे आवश्यक आहे. कार्बोहायड्रेट्सयुक्त अन्नाचा आपल्या शरीरावर साखर आणि कॅफीन सारखाच प्रभाव होतो. यामुळे झोपण्यापूर्वी असे कुठलेही पदार्थ खावू नयेत, ज्यामुळे आपल्या झोपेत व्यत्यय येईल.
5 / 7
हायड्रेटेड रहा - आपल्या शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी प्या. निर्जलीकरणामुळे आपली उर्जा पातळी कमी होऊ शकते आणि आपल्याला थकवा आणि सुस्तीही जाणवू शकते. यामुळे हायड्रेटेड राहा.
6 / 7
नियमित व्यायाम करा - व्यायामामुळे आपले रक्ताभिसरण चांगले राहते, शरीर फीट राहते. याच बरोबर, व्यायामामुळे तणावपासून दूर राहण्यासही मदत होते. महत्वाचे म्हणजे, सकाळी व्यायाम केल्याने रात्री चांगली झोप लागते.
7 / 7
तणावापासून दूर राहा - तणाव हा आपल्या झोपेचा सर्वात मोठा शत्रू आहे. यामुळे तणावाचा सामना करण्यासाठी मेडिटेशण एक चांगला उपाय आहे. ध्यान केल्याने शरीर ताजेतवाने राहते आणि तणाव दूर होण्यासही मदत होते.
टॅग्स :Healthआरोग्यExerciseव्यायामfoodअन्न