Stress relief tips and exercises
तणावात आहात? मग दररोज सकाळी 'हे' नक्की करा By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 4:03 PM1 / 6आज प्रत्येकाला घडाळ्याच्या काट्यासोबत धावावं लागतं. कामाच्या आणि घरगुती कारणामुळे स्वत: साठी मोकळा न मिळाल्यामुळे तणाव वाढतो. अशावेळी तणाव कमी करायचा कसा हे जाणून घेऊया.2 / 6सकाळी लवकर उठून स्वच्छ हवा घ्या, मग अशा वेळी सकाळचं प्रसन्न वातावरण मन प्रफुल्लित करतं. 3 / 6रोज सकाळी उठल्यावर घरातील दरवाजे, खिडक्या उघडा. बाहेरची ताजी हवा आणि सूर्यकिरणं घरामध्ये येऊ द्या. त्यामुळे मन शांत होते आणि आपली चीडचीड कमी होऊन काम करण्यास उत्साह येईल.4 / 6व्यायाम केल्याने तणाव कमी होतो. त्यामुळे रोज सकाळी मोकळ्या वातावरणात व्यायाम करा. 5 / 6दिवसाची सुरुवात चांगली करायची असल्यास तुम्ही तुमच्या आवडीची गाणी ऐका. तसेच थोडसं चिंतन करा जेणेकरून शरीरातील थकवा दूर होईल.6 / 6कामाचं योग्य नियोजन नसल्यास कित्येकदा तणाव निर्माण होतो. त्यामुळे रोज रात्री आठवणीने अलार्म लावा. सकाळी उठल्यावर दिनक्रम ठरवा म्हणजे तुम्ही ठरवलेली कामं वेळेत पूर्ण करू शकाल. आणखी वाचा Subscribe to Notifications