Structure and color of nails reveal the secret of your health
नखांचा रंग आणि आकारावरून होतो आरोग्याचा खुलासा, जाणून घ्या काही गंभीर संकेत! By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 11:40 AM1 / 8Internal Health Revealed by Nails: नखं आपल्या सुंदरतेचा भाग तर असतातच, सोबतच आपल्या आरोग्याबाबतही खूप काही सांगत असतात. नखांचा रंग, आकार यात होणारे बदल हे आरोग्यासंबंधी काही संकेत देऊ शकतात. काही आजारांचे प्राथमिक लक्षणं नखांवरही दिसतात. त्यामुळे नखांमध्ये होत असलेल्या बदलांवर लक्ष देण्याची गरज असते. जर तुम्हालाही नखांमध्ये काही बदल दिसत असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांना दाखवा. 2 / 8नखं जर सामान्यापेक्षा जास्त पिवळे दिसत असतील तर हा लिव्हरसंबंधी समस्येचा संकेत असू शकतो. जसे की, हेपेटायटिस, लिव्हर सर्कोसिस किंवा बाइल डक्ट ब्लॉकेज. त्याशिवाय काही फंगल इन्फेक्शनमुळेही नखांचा रंग पिवळा होऊ शकतो.3 / 8नखं पांढरे होणे किंवा रंग फिका पडणे, खासकरून जर नखांचे टोक पिवळे किंवा लाल असतील तर हा हार्ट डिजीज किंवा किडनीसंबंधी समस्येचा संकेत असू शकतो. हा शरीरात आयर्नची कमतरता आणि इंटरनल ब्लीडिंगचाही संकेत असू शकतो.4 / 8नखं जर सहजपणे तुटत असतील तर हा शरीरात कॅल्शिअम किंवा व्हिटॅमिन डी कमी असल्याचा संकेत असू शकतो. तसेच तणाव आणि थायरॉइडच्या समस्येमुळेही नखं कमजोर होतात. 5 / 8नखांवर लांब रेषा एखाद्या इन्फेक्शनचा, हृदयाच्या समस्येचा किंवा शुगरच्या समस्येचा संकेत असू शकतो. या रेषा नखांच्या विकासात अडथळा ठरतात. 6 / 8नखांवरील पांढऱ्या डागांना 'Leukonychia' म्हटलं जातं. सामान्यपणे रक्तात झिंकची कमतरता, फंगल इन्फेक्शन किंवा जखम यामुळेही हे होतात. जर हे डाग वाढत असतील तर किडनी किंवा लिव्हरसंबंधी समस्येकडे इशारा करतात.7 / 8जर नखांमध्ये असमानता असेल, रखरखीत डाग किंवा चट्टे दिसतील तर हा त्वचेसंबंधी समस्यांचा संकेत असू शकतो. जसे की, एग्जिमा, सोरायसिस किंवा लूपस.8 / 8नखं निळे पडणे किंवा रंग विचित्र होणे, शरीरात ऑक्सीजनची कमतरता असण्याकडे इशारा करतो. हा श्वसनासंबंधी समस्या जसे की, अस्थमा, ब्रोंकायटिस किंवा हार्ट डिजीजचा संकेत असू शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications