studies coronavirus outbreak in the world america britain china covid cases death toll
जगावर पुन्हा कोरोनाचं सावट? जर्मनीमध्ये 3 लाख तर फ्रान्समध्ये 1.5 लाख रुग्ण By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 1:33 PM1 / 8जगातील अनेक देश पुन्हा एकदा कोरोना व्हायसरच्या (Coronavirus) संकटात सापडले आहेत, तर काही अजूनही कोरोना व्हायरसचा सामना करत आहेत. कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटने युरोप आणि आशियातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कहर केला आहे. 2 / 8दरम्यान, मॉडर्नाचे सीईओ स्टीफन बन्सल यांनी म्हटले आहे की, नवीन कोरोना व्हायरसचा व्हेरिएंट आधीच्या व्हेरिएंटपेक्षा जास्त धोकादायक असण्याची 20 टक्के शक्यता आहे. 3 / 8जर्मनीमध्ये 2,96,498 नवीन कोरोनाची प्रकरणे आल्यानंतर एकूण प्रकरणांची संख्या 1,98,93,028 झाली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, युरोपियन देशांमध्ये आतापर्यंत 1.28 लाखांहून अधिक लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. गुरुवारपासून आतापर्यंत 288 मृत्यूची नोंद झाली आहे.4 / 8दक्षिण कोरियामध्ये सर्वात वाईट स्थिती पाहायला मिळत आहे. दक्षिण कोरिया हा आशियातील असा देश आहे, जिथे मार्चमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. याठिकाणी दररोज सुमारे पाच लाख नवे रुग्ण आढळून येत आहेत. 5 / 8 इटलीमध्ये कोरोना व्हायरसचे 81,811 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर एका दिवसापूर्वी 76,260 प्रकरणे नोंदवण्यात आली होती.6 / 8ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान, इस्रायलप्रमाणेच, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना लसीचा चौथा डोस दिला जात आहे. अमेरिकेतील तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, अमेरिका तसेच युरोपमध्येही कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होऊ शकते.7 / 8दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने ओमायक्रॉन बीए.2 सब व्हेरिएंट सर्वात वेगाने प्रसार होणारा व्हेरिएंट असल्याचे म्हटले आहे. आता तिसरी लाट संपल्यानंतर चीन, दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग, ब्रिटन सारख्या देशांमध्ये या नव्या व्हेरिएंटचा उद्रेक होऊ लागला आहे. 8 / 8आता ओमायक्रॉन बीए.२ सब व्हेरिएंटने भारतातही प्रवेश केला असल्याची माहिती समोर आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications