Study claims these 5 foods decrease lifespan and raise the risk of early death
आयुष्य कमी करतात तुम्ही रोज खात असलेले 'हे' पदार्थ, लवकर मृत्यूचा वाढतो धोका By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 3:53 PM1 / 7आजकाल लोक सहजपणे वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहेत. याला कारण चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आहेत. द बीएमजे जर्नलमध्ये प्रकाशित 30 वर्ष झालेल्या एका रिसर्चनुसार, जर तुम्ही पॅकेज्ड बेकरी फूड्स, स्नॅक्स, फिजी ड्रिंक्स, स्वीट सीरिअल आणि रेडी-टू-ईट किंवा हीट-इन फूड्सचं सेवन करत असाल तर या गोष्टी तुमचं आयुष्य कमी करत आहेत. अशात तुम्हाला अवेळी मृत्यूचा धोका वाढतो.2 / 7पॅकेज्ड फूडमध्ये अनेकदा कलर, इमल्सीफायर, फ्लेवर आणि इतर एडिटिव्स आढळतात. यात सामान्यपणे जास्त कॅलरी, एक्स्ट्रा शुगर, सॅचुरेटेड फॅट आणि मीठही जास्त असतं.3 / 7तसेच या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन आणि फायबरही कमी असतं. म्हणजे याचाच अर्थ असा की, या गोष्टींमधून शरीराला काहीच पोषण मिळत नाही. उलट नुकसान होतं.4 / 7या गोष्टींच्या नियमित सेवनामुळे लठ्ठपणा, डायबिटीस आणि हाय ब्लड प्रेशरचा धोका वाढतो. ज्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला हृदयरोग आणि कॅन्सरचाही धोका वाढतो.5 / 7रिसर्चमधून समोर आलं की, दिवसातून सरासरी 7 वेळा पॅकेज्ड फूड खाल्ल्याने एकूण मृत्यूचा 4 टक्के जास्त धोका असतो आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका 9 टक्के जास्त राहतो.6 / 7रिसर्चमधून असंही आढळलं की, पॅकेज्ड मीट, चिकन आणि सीफूडपासून तयार रेडी-टू-ईट पदार्थ खाल्ल्याने मृत्यूचा धोका सगळ्यात जास्त वाढतो. त्याशिवाय शुगर, डेअरी उत्पादनांपासून बनवलेल्या मिठाई आणि पॅकेज्ड ब्रेकफास्ट फूडचा नंबर येतो.7 / 7अभ्यासकांनी सांगितलं की, हा रिसर्च या गोष्टीचं समर्थन करतो की, जास्त काळ निरोगी राहण्यासाठी आणि मृत्यूचा धोका टाळण्यासाठी खासप्रकारच्या पॅकेज्ड फूडचं सेवन कमी केलं पाहिजे. आणखी वाचा Subscribe to Notifications