शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एखाद्याच्या मनात आत्महत्येचे विचार आहेत हे कसं ओळखाल? जाणून घ्या काही खास लक्षणे....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 3:30 PM

1 / 12
जेव्हापासून अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली तेव्हापासून सगळीकडून डिप्रेशन, आत्महत्या, त्यापासून बचाव अशा विषयांवर चर्चा करत आहेत. हे आहेच की, सुशांतचं अशाप्रकारे या जगातून निघून जाणं आपल्या मनाला धक्का देणारं आहे. पण आता आपण सुशांतला परत आणू शकत नाही, पण त्याच्या आजारपणातून आणि आत्महत्येतून काही शिकू नक्कीच शकतो. जेणेकरून दुसऱ्या या स्थितीत जाण्यापासून रोखता यावं.
2 / 12
साधारणपणे जगभरात दरवर्षी तब्बल 8 लाख लोक आत्महत्या करतात अशी एक आकडेवारी आहे. या हिशेबाने 40 सेकंदात एक व्यक्ती आत्महत्या करतो. जर केवळ आपल्या देशाबाबत सांगायचं तर दरवर्षी साधरण 1 लाख लोक आत्महत्या करून त्यांचं जीवन संपवतात.
3 / 12
WHO नुसार, जगभरात 15 ते 30 वयोगटातील जेवढ्या तरूणांचा मृत्यु एका वर्षात होतो, त्यांचं मृत्यूचं दुसरं मोठं कारण आत्महत्या असते. सोबतच 30 ते 45 वयोगटातील जेवढ्या लोकांचा मृत्यू एका वर्षात होतो, त्यांच्यात मृत्यूचं तिसरं मोठं कारण आत्महत्या असतं.
4 / 12
एक्सपर्ट काय सांगतात? - कोणत्याही व्यक्तीमध्ये निराशा कमी असो वा जास्त असो, या निराशेची एखाद्या व्यक्तीने आत्महत्या करण्याचे पाउल उचलण्यात फार मोठी भूमिका असते.
5 / 12
निराशेत असलेल्या व्यक्तीच्या मनात सतत असे विचार येत राहतात की, आता स्थिती हाताबाहेर गेली आहे. ती आता सुधारली जाऊ शकत नाही. आपली स्थिती चांगली करण्याचा कोणताही पर्याय उरला नाही. याच कारणांमुळे त्यांच्यात उदासी फार खोलवर बसते. याच कारणाने त्यांना कोणतीही आशेचा किरण दिसत नाही.
6 / 12
व्यक्तीच्या मनात त्याचं काम, परिवार, मित्र आणि आजूबाजूच्या लोकांबाबत एक निराशा भरली जाते. ते त्यांच्यासाठी मित्रांनी आणि परिवाराने केलेल्या काही चांगल्या कामाकडे सकारात्मकतेने बघू शकत नाहीत.
7 / 12
अशात व्यक्ती स्वत:ला दुसऱ्यावरील ओझं समजू लागतो. त्याला वाटू लागतं की, त्याच्यामुळे हे सगळे लोक परेशान आहेत. त्यामुळे त्यांना लोकांच्या आणि स्वत:च्या समस्यांपासून, अडचणींपासून दूर जायचं असतं. अशात आत्महत्येचा विचार त्यांच्या मनात नेहमी येतो.
8 / 12
जी व्यक्ती निराश आणि डिप्रेशनने वेढलेली असते ती सतत नकारात्मक आणि दु:खी गोष्टी करतात. अशी व्यक्ती जेव्हाही मित्रासोबत किंवा परिवारातील कुणासोबत बोलते तेव्हा पुर्नजन्म, मृत्यूनंतरचं जीवन, आत्मा अशा विषयावर बोलते.
9 / 12
निराशा आल्याने काही लोक त्यांच्या मित्रांना किंवा परिवारातील लोकांना भेटणे बंद करतात किंवा त्यांच्याशी बोलणं बंद करतात. आजच्या जमान्यात सोशल मीडियावरील पोस्टमधूनही त्यांच्या मानसिक स्थितीबाबत जाणून घेता येऊ शकता.
10 / 12
जर तुमचा एखादा मित्र किंवा मैत्रीण सतत निराशा असलेल्या पोस्ट, मृत्यु, पुर्नजन्म अशा विषयांवर बोलत असेल तर तुम्ही त्याच्याशी बोललं पाहिजे. यादरम्यान हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा की, तुमचा मित्र एखाद्या गोष्टीमुळे निराश तर नाही ना.
11 / 12
जेवढ्याही आत्महत्येच्या केसेस असतात त्यातील 80 टक्के केसेसमध्ये डिप्रेशन हे एक मोठं कारण असतं. अशात आपल्या सर्वांना डिप्रेशनबाबत माहिती असणे गरजेचे आहे.
12 / 12
आपण सर्वांनी मानसिक आजारांबाबत आपलं नॉलेज वाढवलं पाहिजे. जेणेकरून गरज पडेल तेव्हा तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांची मदत करू शकाल. त्यांना आत्महत्या करण्यापासून रोखू शकाल.
टॅग्स :Suicideआत्महत्याMental Health Tipsमानसिक आरोग्यHealthआरोग्य