शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

उन्हाळा आलाय, सावधान! ‘या’ कारणांमुळे होऊ शकतं इन्फेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2019 6:46 PM

1 / 7
लोकल आणि बसमध्ये हॅंडल पकडताना, भाजी विक्रेत्याकडून पैसे घेताना, ऑफिसमध्ये काम करताना, दुकानात कपडे ट्राय करताना, कधी विचार केलाय का, की या गोष्टींना हात लावल्यामुळे इन्फेक्शनचा धोका होऊ शकतो? 
2 / 7
खातेवेळी, किबोर्डचा वापर करताना, सार्वजनिक वाहनांच्या हँडलला हात लावल्याने, नळाला हात लावताना,पेन किंवा पेपर दुसऱ्या व्यक्तीला देताना, दुसऱ्या व्यक्तींचं टॉवेल वापरताना,विसीटींग कार्ड देताना अशा गोष्टींमुळेही इन्फेक्सन होऊ शकते.
3 / 7
उन्हाळा आल्यामुळे माणसांना घाम येतो, मात्र या घामामुळे ससर्गजन्य जंतू पसरुन इन्फेक्शन होण्याचं प्रमाण वाढू शकतं. आपल्या आजूबाजूला असंख्य प्रमाणात जंतू आहेत. प्रत्येक ठिकाणी वावरताना आपला या जंतूंशी संपर्क येतो.
4 / 7
इन्फेक्शनपासून दूर राहण्यासाठी घरातून बाहेर पडताना मास्कचा वापर करा, नेहमी हात स्वच्छ धुवा, रस्त्यावरील पाणी किंवा सरबत पिणं टाळा, स्वतःच्या शरीराची योग्य ती स्वच्छता राखा, तुम्ही राहत असलेला परिसर स्वच्छ ठेवा
5 / 7
आजंही लोकं पैसे बोटाला थूक लावून मोजताना दिसतात. थूंकी किंवा लाळेतून इन्फेक्शन पसरण्याचा मोठा धोका असतो. जेव्हा आपण नोटांना हात लावतो तेव्हा जंतू आपल्यापर्यंत पोहोचतात. यामुळे घशाचे त्रास, व्हायरल इन्फेक्शनसारखे आजार होऊ शकतात.
6 / 7
कपडे खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर आपण कपडे ट्राय करण्यासाठी घेतो. मात्र याच तुमच्या सवयीमुळे तुम्हाला त्वचा रोग होण्याची शक्यता अधिक असते. अंगावर पुरळ येणे, खाज येणे अशा प्रकारचे आजार उद्भवण्याची शक्यता जास्त असते.
7 / 7
इन्फेक्शनपासून दूर राहण्यासाठी घरातून बाहेर पडताना मास्कचा वापर करा, नेहमी हात स्वच्छ धुवा, रस्त्यावरील पाणी किंवा सरबत पिणं टाळा, स्वतःच्या शरीराची योग्य ती स्वच्छता राखा, तुम्ही राहत असलेला परिसर स्वच्छ ठेवा
टॅग्स :Healthआरोग्यInfectious Diseaseसंसर्गजन्य रोग