Summer Health Tips : Mangoes serious side effects from allergic reaction to weight gain
Mango Side Effect : आंब्याचे सायलेंट साइड इफेक्ट्स, शरीराला होणारे हे ६ नुकसान वाचून वाढेल चिंता! By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 1:00 PM1 / 7फळांचा राजा आंबा आपल्या टेस्ट आणि गोडव्यासाठी लोकप्रिय आहे. आब्यांचा सीझन आला की लोक आब्यांवर तुटून पडतात. आंबा भलेही आपल्या चिभेचे चोचले पुरवत असेल, पण याने साइड इफेक्टही तुम्हाला माहीत असले पाहिजे. जेवढे याचे आरोग्याला फायदे आहेत तेवढेच तोटे आहेत. हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, जर आंबा योग्यप्रकारे खाल्ला गेला नाही तर याने आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. चला जाणून घेऊ आंब्याचे साइड इफेक्ट्स...2 / 7अॅलर्जी - आंबा खाल्ल्याने शरीरात अॅलर्जी होण्याचा धोका वाढत असतो. लेटेक्स अॅलर्जीने पीडित लोकांना आंबा नुकसान पोहोचवू शकतो. सामान्यपणे तेव्हा जेव्हा कुणी सिंथेटिक मटेरिअलबाबत संवेदनशील असेल. आंब्यात आढळणारं प्रोटीन लेटेक्ससारखंच असतं जे आधीच अॅलर्जीच्या शिकार असलेल्या लोकांसाठी अडचण निर्माण करू शकतं.3 / 7हाय ब्लड शुगर - टेस्टी आणि गोड आंब्यात नॅच्युरल शुगर खूप जास्त प्रमाणात असते. ज्यामुळे याने वेगाने ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की, डायबिटीस किंवा इतर लाइफस्टाईल डिसॉर्डरच्या केसमध्ये नॅच्युरल शुगर शरीरात रेग्युलर शुगरप्रमाणेच व्यवहार करते. त्यामुळे अशा लोकांना आंब्याची क्वांटिटी म्हणजे त्याच्या पोर्जन साइजवरही लक्ष द्यायला हवं.4 / 7लो फायबर - आंब्याचे काही प्रकार असेही असतात ज्यात फायबरचं प्रमाण त्यांच्या गुठळी आणि सालीपेक्षाही कमी असतं. हे सामान्यपणे लोक खात नाहीत. अशाप्रकारचे आंबे आपल्या डायजेशन प्रोसेसला सपोर्ट करत नाहीत. त्यामुळे डॉक्टर्स नेहमी फायबर असलेले आंबे खाण्याचा सल्ला देतात जे डायजेशन प्रोसेससाठी चांगले मानले जातात.5 / 7वजन वाढणं - एक्सपर्ट सांगतात की, फार जास्त प्रमाणात आंबे खाल्ल्या वेगाने आपलं वजन वाढू शकतं. असं होतं कारण इतर फळांच्या तुलनेत आंब्यात कमी कॅलरी, हाय नॅच्युरल शुगर आणि हाय कॅलरी आढळतात. हेच कारण आहे की, जास्त आंबे खाल्ल्याने आपलं वजन वाढतं.6 / 7पोटासंबंधी समस्या - हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, आंब्याचं अत्याधिक सेवन जीआय डिस्ट्रेसला वाढवतं. यात असलेल्या कार्बोहायड्रेट IBS म्हणजे इरिटेबल बोवेल सिंड्रोमला ट्रिगर करू शकते आणि डायजेस्टिव सिस्टमला खराब करू शकते.7 / 7पोटासंबंधी समस्या - हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, आंब्याचं अत्याधिक सेवन जीआय डिस्ट्रेसला वाढवतं. यात असलेल्या कार्बोहायड्रेट IBS म्हणजे इरिटेबल बोवेल सिंड्रोमला ट्रिगर करू शकते आणि डायजेस्टिव सिस्टमला खराब करू शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications