शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लक्षणे वेगळी, परिणाम गंभीर; कोविडच्या ३ वर्षांनी अचानक तापाचं प्रमाण का वाढतंय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2023 1:38 PM

1 / 8
तुमचा घसा खवखवतोय? वाढत्या तापमानामुळे सर्दी-खोकला झालाय? तुम्ही एकटेच नाही. अचानक भारतात तापाची साथ वेगाने पसरत आहे. बहुतांश भारतीय सध्या तापाचा सामना करत आहेत. त्यांना ठीक होण्यासाठी बराच वेळ लागत आहे.
2 / 8
तापामुळे काही रुग्णांना आयसीयूत भरती होण्याची वेळ आली आहे. ताप बरा होण्यासाठी पूर्वीपेक्षाही जास्त कालावधी लागत आहे कारण वातावरणात बदल झाला आहे असं डॉक्टरांचे म्हणणं आहे. उत्तर भारतात अचानक थंडी गायब झाली असून खराब वातावरणामुळे स्थिती आणखी भयंकर झाली आहे.
3 / 8
TOI ला दिलेल्या मुलाखतीत डॉ. संदीप बुधीराजा म्हणाले की, यावर्षी तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. परंतु यंदा लक्षणे वेगळी आहेत. पूर्वीपेक्षाही भयंकर गंभीर स्थिती आहे. बहुतांश रुग्णांना सलग खोकला अथवा मध्ये मध्ये खोकला येत आहे असं इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल मेडिसिनमध्ये आलंय.
4 / 8
तापातून बरे झाल्यानंतर अनेक दिवस खोकला सुरूच राहतो. साधारण फेब्रुवारी, मार्च महिन्यात तापाचे प्रमाण उत्तर भारतात कमी असते. परंतु यंदा रुग्ण वाढले आहेत. भारत एकमेव नाही जिथं तापाचे रुग्ण वाढत आहेत असंही डॉक्टर संदीप बुधीराजा यांनी सांगितले.
5 / 8
वाढत्या तापाच्या रुग्णांचे कारण काय? - अचानक वातावरणात झालेला बदल, रेस्पिरेटरी व्हायरस हवेत राहणे, फ्ल्यू व्हॅक्सिनेशनची कमतरता यामुळे लोकांमध्ये तापाचे प्रमाण वाढत आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
6 / 8
फ्लूला इन्फ्लूएंझा असंही म्हणतात. अनेकदा हे गंभीर असू शकतं यामुळे मृत्यूचा धोकाही संभावतो. लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला, दमा, डायबिटीज अथवा अन्य कोणत्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी हे अधिक धोकादायक आहे.
7 / 8
ताप आल्यानंतर सौम्य ते गंभीर लक्षणे दिसू शकतात. या आजारात ताप, खोकला, सर्दी, घशात खवखवणे, अंगदुखी, थकवा यासारख्य समस्या जाणवतात. काही प्रकरणात हे आणखी गंभीर होऊ शकते. गंभीर झाल्यावर त्याचे दुष्परिणाम आहेत.
8 / 8
ही समस्या गंभीर झाल्यावर निमोनिया अथवा ब्रोंकाइटिसचं आव्हान उभं राहू शकते. त्याशिवाय कानातही त्याचे इंफेक्शन झाल्याचं दिसू शकते. जगभरात दरवर्षी तापामुळे २.९० ते ६.५० लाख लोकांचा मृत्यू होतो असं एक अंदाज वर्तवण्यात आला आहे.