Symptoms of end or last stage diabetes in men and women you should know
7 लक्षण सांगतात लास्ट स्टेजमध्ये आहे डायबिटीस, आतून सडलं आहे शरीर By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 1:16 PM1 / 9Diabetes Signs and Symptoms: डायबिटीस एक असा आजार आहे ज्यावर काही ठोस उपचार नाही. हा आजार हळूहळू आतून तुम्हाला संपवतो. जेव्हा हा आजार लास्ट स्टेजमध्ये पोहोचतो तेव्हा काही घातक लक्षण दिसू लागतात. त्यांबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.2 / 9डायबिटीसच्या लास्ट स्टेजची लक्षण - पुन्हा पुन्हा लघवी येणे, चक्कर येणे, सुन्नपणा डायबिटीसची सुरूवातीचे संकेत आहेत. पण याच्या शेवटच्या लक्षणांबाबत जाणून घेऊ. एंड स्टेज डायबिटीसला अॅडव्हांस किंवा लास्ट स्टेज डायबिटीस म्हटलं जातं. यात अनेक गंभीर समस्या होतात आणि जीवाला धोकाही होतो. एंड स्टेज डायबिटीसमध्ये खालची लक्षणं दिसतात. पण हेही खरं आहे की, प्रत्येक व्यक्तीमध्ये ही वेगवेगळी असतात. याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.3 / 9किडनी खराब होणे - डायबिटीसमुळे किडनी खराब होते. जी वेळेनुसार अधिक घातक होत जाते. यामुळे थकवा, सूज, लघवी कमी किंवा जास्त येणे तसेच डायलिसीसची गरज पडू शकते.4 / 9न्यूरोपॅथी - डायबिटीसमुळे नसा कमजोर होतात आणि न्यूरोपॅथीची समस्या होऊ शकते. ज्यामुळे वेदना, सुन्नपणा आणि टिंगलिंगची समस्या होऊ शकते. याने चालण्यात अडचण येते आणि याने प्रभावित अवयवांमध्ये जडपणा येतो.5 / 9दिसण्यात समस्या - अॅडव्हांस डायबिटीसमुळे डायबिटीक रेटिनोपॅथी होतो. ज्यामुळे डोळ्यांच्या ब्लड वेसेल्स डॅमेज होतात आणि यामुळे दिसणं बंद होतं किंवा कमी दिसू लागतं.6 / 9हार्ट डिजीज - Diabetes.UK नुसार, ब्लड शुगर जास्त काळ राहिल्याने हृदयरोगाचा धोका खूप वाढतो. लास्ट स्टेजमध्ये रूग्णाला छातीत वेदना, श्वास घेण्यास समस्या, हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकही येऊ शकतो.7 / 9पायांची समस्या - खराब ब्लड सर्कुलेशन आणि न्यूरोपॅथीने पायांमध्ये जखमा किंवा इन्फेक्शन होऊ शकतं. जे भरण्यासाठी बराच वेळ लागतो. यामुळे गॅंग्रीन आणि पाय कापण्याची वेळही येऊ शकते.8 / 9गॅस्ट्रोपॅरेसिस - हाय ब्लड शुदरमुळे पोटातील टिश्यूंना ऑक्सिजन आणि ब्लड पोहोचवणाऱ्या नसा डॅमेज होतात. यामुळे डायजेस्टिव सिस्टीमवर वाईट प्रभाव पडतो. ज्यामुळे उलटी, मळमळ, पोट फुगणं आणि पोटदुखी अशा समस्या होतात.9 / 9हिरड्या खराब होणे - डायबिटीसमुळे लाळेत शुगरचं प्रमाण वाढतं आणि बॅक्टेरियाही वाढतात. या बॅक्टेरियांमधून अॅसिड निघतं जे दातांवरील थर आणि हिरड्यां खराब करतात. आणखी वाचा Subscribe to Notifications