Symptoms of serious diseases and health problems facts
लघवीचा रंग बदलणे, तोंडाची दुर्गंधी...गंभीर समस्या सुरू होण्याआधीचे आहेत हे 8 संकेत By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 11:43 AM1 / 8सर्दी आणि खोकला सामान्य समस्या समजल्या जातात. पण प्रत्येकवेळी या समस्या सामान्य नसतात. अनेकदा या समस्या गंभीर आजाराची सुरूवात असतात. याशिवाय अशी अनेक लक्षणं आहेत जसे की, शरीरावर निळे डाग पडणं, डोळ्यांची फडफड होणं आणि सतत नाक वाहत राहणं. आपलं शरीर आपल्याला वेगवेगळ्या आजारांचे संकेत देत असतं. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो. जर तुम्हाला एखाद्या लक्षणाचा अनुभव अनेक दिवसांपासून होत असेल तर वेळीच डॉक्टरांना भेटा.2 / 8छातीत दबाव - छातीत दबाव किंवा जडपणा जाणवत असेल हे हार्ट अटॅकच्या आधी दिसणाऱ्या लक्षणांपैकी एक असू शकतं. जर तुम्हाला असं अनेक दिवसांपासून जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांना भेटा. तसेच तुम्हाला यासोबत छातीत वेदना, श्वास घेण्यास समस्या, थंड घाम किंवा मळमळ अशीही लक्षणं दिसू लागतात.3 / 8ड्राय स्किन - ड्राय स्किन वरूनही तुमच्या आरोग्याबाबत बरंच काही समजत असतं. जर तुम्हाला आरोग्यासंबंधी काही समस्या असेल तर याचं कारण त्वचेसंबंधी एखादा आजारही असू शकतो. तशी तर ड्राय स्किन होणं ही सामान्य समस्या आहे. पण ड्राय स्किनसोबत इतरही काही लक्षणं दिसत असतील वेळीच डॉक्टरांना भेटा.4 / 8अचानक वजन कमी होणं - अचानक वजन कमी होणंही एखाद्या मोठ्या आजाराचा संकेत असू शकतो. जर तुम्ही कोणत्या प्रकारची डाएटिंग किंवा एक्सरसाइज करत नसाल आणि तेव्हाही तुमचं वजन वेगाने कमी होत असेल तर जराही उशीर न करता डॉक्टरांना भेटा. कारण हृदय रोग, थायरॉइड, डायबिटीज आणि कॅन्सरसारख्या आजाराचं हे लक्षण असू शकतं.5 / 8लघवीचा रंग बदलणे - लघवीचा रंग बदलण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात आणि अनेकदा हा बदल तुमच्या आरोग्यासंबंधी संकेतही असू शकतो. खासकरून एखाद्या गंभीर इन्फेक्शनचा. काही खाद्यपदार्थ किंवा औषधांचं सेवन केल्यावरही लघवीचा रंग बदलू शकतो. तुमच्यात याचं काय कारण आहे हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांना भेटा.6 / 8तोंडाची दुर्गंधी - अनेकदा गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्यांमुळेही तोंडातून घाणेरडी दुर्गंधी येऊ शकते. जसे की, अपचन, गॅस्ट्रायटिस किंवा पोटासंबंधी समस्या. त्याशिवाय हे कमजोर इम्यून सिस्टीमचाही संकेत आहे. 7 / 8पायांवर सूज - पायांवर सतत सूज असण्याला गंभीरतेने घेतलं पाहिजे आणि याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. जर तुमच्या पायांवर नेहमीच सूज राहत असेल तर ही समस्या थायरॉइड, किडनी किंवा हृदयासंबंधी असू शकते. जर सूज बऱ्याच दिवसांपासून असेल तर वेळीच डॉक्टरांना भेटा.8 / 8हात-पाय थंड राहणे - हात-पाय नेहमीच थंड राहणं काही सामान्य नाही. हे अनेक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचं कारण आहे. त्याशिवाय हात-पाय सतत थंड राहणं शरीरात ब्लड सर्कुलेशनच्या समस्येचा संकेत असू शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications