शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

उन्हाचा पारा चढतोय, अशी घ्या स्वतःची काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 12:50 PM

1 / 10
अतिनील किरणांचा सर्वाधिक त्रास या काळात होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यात जास्त पाणी पिणे कधीही चांगले. मात्र, अतिशय थंड पाणी पिणे टाळा.
2 / 10
दुपारी १२ जे ३ या वेळेत फिरू नये. उष्णता वाढल्यास तोंडालाही रुमाल बांधा, नाक, कान पांढ-या रुमालने झाका.
3 / 10
फिकट रंगाचे सैल कपडे वापरा, हाफ बाह्यांचे कपडे टाळा.डोक्यावर नेहमी पांढरा रुमाल अथवा टोपी वापरा, तसेच गॉगल, छत्री आणि बुटांचा वापर करा.
4 / 10
एसीतून लगेच उन्हात किंवा उन्हातून लगेच एसीत जाऊ नका, पंधरा मिनिटे सावलीत काढल्यानंतर, उन्हात किंवा उन्हातून सावलीत १५ मिनिटे उभे राहिल्यानंतर एसी किंवा कुलरच्या हवेत जा.
5 / 10
ज्यांना हृदयविकाराचा, तसेच मधुमेहाचा त्रास आहे, त्यांनी नियमित तपासणी करावी.
6 / 10
आहारामध्येही रसदार फळांचा वापर करावा, तसेच मांसाहार कदापिही करू नये.
7 / 10
मद्यसेवन, चहा-कॉफी आणि काबोर्नेटेड सॉफ्ट फार ड्रिंक्स घेऊ नका, त्यामुळे शरीर डिहायड्रेट होते.
8 / 10
दही, ताकाचा आहारात समावेश करा. बाहेर जाताना बाटलीत पाणी घेऊन जा आणि गरज वाटल्यास पाणी पीत राहा. शक्यतो, उन्हात जाणे टाळा.
9 / 10
आपले घर थंड ठेवा, पडदे, झडपा, सनशेड बसवा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा. पंख्याचा वापर करा, थंड पाण्याने आंघोळ करा.
10 / 10
पार्किंग केलेल्या वाहनामध्ये मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका.