शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चिंताजनक! त्यामुळे भारतीय पुरुषांमधील स्पर्म काऊंट वेगाने घटतोय, तज्ज्ञांनी सांगितलं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 2:02 PM

1 / 5
भारतासह संपूर्ण जगामधील पुरुषांच्या स्पर्म काऊंटमध्ये वेगाने घट होत असल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अभ्यासामधून ही माहिती समोर आली आहे.
2 / 5
इस्राइलमधील हिब्रू युनिव्हर्सिटी ऑफ जेरुसलेमच्या संशोधकांनी या अध्ययनामध्ये सांगितले की, जगभरामध्ये पुरुषांचा स्पर्म काऊंट हा १९७३ च्या तुलनेत २०१८ मध्ये अर्ध्याहून अधिक कमी झाला आहे. या संशोधनासाठी भारतासह ५३ देशांमधील आकडेवारी गोळा करण्यात आली.
3 / 5
फोर्टिस रुग्णालयातील आव्हीएफ विभागाच्या संचालक डॉ. रिचिका सहाय यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून पुरुषांचं सीमन अॅनॅलिसिस पॅरामिटरमध्ये घट होत आहे. १९९९ मध्ये डब्ल्यूएचओने चौथं आणि पाचवं मेन्युअल बनवलं होतं. त्यामध्ये ही घट दिसून आली. १९५५ चं पहिलं मेन्युअल आणि पाचव्या मेन्युअलची तुलना केल्यास ही घट स्पष्टपणे दिसून येते. मेल फर्टिलिटीसाठी ही चिंतेची बाब आहे.
4 / 5
अपोलो फर्टिलिटीचे सिनियर कन्सल्टन्ट डॉ. अरिंदम रथ यांनी सांगितले की, पर्यावरण आणि लाईफ स्टाईलचा आपल्या प्रजनन क्षमतेवर विपरित परिणाम झाला आहे. पुरुषांमध्ये टेस्टिकुलर कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत. तसेच सीमन क्वालिटी आणि टेस्टोस्टेरोन लेव्हलमध्ये घट दिसून येत आहे. रिसर्चनुसार गेल्या ५० वर्षांत पुरुषांमधील स्पर्म काऊंट १०४ वरून घटून ४९ दशलक्ष मिलियन प्रति मिलिलिटर एवढा राहिला आहे.
5 / 5
डॉक्टरांच्या मते खराब लाईफस्टाईल, अल्कोहोल आणि सिगारेटचा वापर, आरोग्यास हानिकारक खानपान यांसह अनेक कारणांमुळे स्पर्म काऊंट कमी झाला आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत तणाव हा यासाठी चिंताजनक मानला जात नव्हता. मात्र आता तोही कारण ठरत आहे.
टॅग्स :Healthआरोग्यSexual Healthलैंगिक आरोग्यInternationalआंतरराष्ट्रीय