These 5 drinks will help in fighting sleep deprivation and to have good sleep
शांत झोप लागत नाही?; झोपण्यापूर्वी करा 'या' ड्रिंक्सचं सेवन! By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 12:29 PM1 / 7सध्याच्या धावपळीच्या दैनंदिन जीवनामध्ये दिवसभराच्या थकव्यानंतर गरज असते ती शांत झोपेची. पण अनेकदा खूप थकल्यानंतरही झोप काही येत नाही. जर शांत झोप लागली नाही तर शरीराला थकवा जाणवतो. तसेच अनेक आजारांचाही सामना करावा लागतो. एवढचं नाहीतर शारीरिक समस्यांसोबत मानसिक समस्याही उद्भवतात. तुम्हालाही झोपेसंदर्भात अशाच समस्यांचा सामना करावा लागत असेल तर आज आम्ही तुम्हाला 5 पेय पदार्थांबाबत सांगणार आहोत. जी प्यायल्यानंतर तुम्हाला शांत झोप येण्यास मदत होईल. जाणून घेऊया अशा पेय पदार्थांबाबत... (Image credit : Steemit)2 / 7रात्री झोपण्यापूर्वी एक कप हॉट चॉकलेट प्यायल्याने तुम्हाला शांत झोप येण्यास मदत होईल. त्यामुळे शरीर आणि डोकं रिलॅक्स होतं. त्यामुळे झोपेच्या समस्यांचा सामना करत असाल तर रात्री झोपण्यापूर्वी मस्त हॉट चॉकलेट प्या आणि शांत झोपेचा आनंद घ्या. (Image credit : Land O'Lakes)3 / 7दूधामध्ये अस्तित्वात असलेलं कॅल्शिअण आणि ट्रिप्टोफेन शरीरामधील मेलाटोनिन हॉर्मोन अॅक्टिव्ह करण्यासाठी मदत करतात. यामुळे बॉडी रिलॅक्स होते आणि शांत झोप लागते. यामुळेच मेलाटोनिन हार्मोन्सला स्लीप हार्मोन्स असंही म्हटलं जातं. 4 / 7एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, झोपण्यापूर्वी दोन तास अगोदर चेरी ज्यूस प्यायल्याने शांत झोप येते. तसचे दररोज ज्यूस प्यायल्याने झोप न येण्याची समस्या दूर होते. 5 / 7ग्रीन टीमध्ये अमीनो अॅसिड तत्व असतात. जे स्लीप हार्मोन्स अॅक्टिव्ह करण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर ग्रीन टी गरम असल्यामुळे बॉडी मसल्स रिलॅक्स होण्यास मदत होते. ज्यामुळे झोप शांत येते. 6 / 7नारळ पाण्याला एनर्जी ड्रिंक म्हणून ओळखलं जातं. परंतु, यामध्ये अस्तित्वात असलेलं पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम मसल्स रिलॅक्स करण्यासाठी मदत करतात. तसेच स्ट्रेस दूर करण्यासाठीही मदत करतात. यामुळे जोप न येण्याची समस्या कमी होते. 7 / 7टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत फायदेशीर ठरतं. आणखी वाचा Subscribe to Notifications