These 6 people should stay away from potato
'या' 6 समस्या असलेल्या लोकांनी चुकूनही खाऊ नये बटाटे, आरोग्याचं होऊ शकतं गंभीर नुकसान! By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 10:45 AM1 / 7Disadvantages of Potato : बटाटा वडा असो, बटाट्याची चटणी किंवा भाजी असो, बटाट्याचे चिप्स असो बटाटे भारतीय आहारातील एक महत्वाचा भाग आहेत. बटाट्यांचा वापर वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. बटाटे खाणं लोकांना तर आवडतंच, सोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. मात्र, काही स्थितींमध्ये बटाट्यांचं सेवन आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. जर काही समस्या असेल तर बटाट्यांचं सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. अशात कोणत्या समस्या असल्यावर बटाट्यांचं सेवन नुकसानकारक ठरू शकतं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.2 / 7बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त असतात, जे ब्लड शुगर लेव्हल वाढण्याला कारणीभूत ठरतात. त्यामुळे डायबिटीसच्या रूग्णांनी बटाट्याचं सेवन कमी प्रमाणात करण्याचा सल्ला दिला जातो. जर बटाटे खायचेच असेल तर ते उकडून आणि इतर भाज्यांसोबत मिक्स करून खाऊ शकता.3 / 7बटाट्यामध्ये कॅलरी आणि कार्बोहायड्रेट जास्त असतात. ज्यामुळे वजन कमी करण्यात समस्या होऊ शकते. बटाट्याच्या जास्त सेवनाने शरीरात फॅट जमा होऊ लागतं. अशात तुम्ही इतर कमी कॅलरी आणि जास्त फायबर असलेल्या पदार्थांचं सेवन करू शकता.4 / 7काही लोकांना बटाटे खाल्ल्याने गॅस, सूज किंवा पचनासंबंधी इतर समस्या होऊ शकतात. बटाट्यांमध्ये शुगर आणि स्टार्च असतं. ज्यामुळे काही लोकांना या समस्या अधिक होऊ शकतात. जर कुणाला आधीच पोटासंबंधी समस्या असेल तर त्यांनी बटाटे खाणं टाळलं पाहिजे.5 / 7काही लोकांना बटाट्यांनी एलर्जी होऊ शकते. ज्यामुळे त्वचेवर रॅशेज, खाज आणि इतरही समस्या होऊ शकतात. अशात लोकांनी बटाट्यांचं सेवन टाळलं पाहिजे.6 / 7बटाट्यांमध्ये प्यूरिन भरपूर प्रमाणात असतं, पण याच्या जास्त सेवनाने गाउटच्या रूग्णांना समस्या होऊ सकते. जर कुणाला आधीच यूरिक अॅसिडची समस्या असेल त्यांनी बटाट्याचं सेवन कमी प्रमाणात केलं पाहिजे. 7 / 7बटाट्यांचं तळलेल्या रूपात सेवन करणं हृदयरोग असलेल्यांसाठी घातक ठरू शकतं. यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकतं आणि हृदयासंबंधी समस्याही होऊ शकतात. आणखी वाचा Subscribe to Notifications