शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पचनक्रिया बिघडलीय?, आहारात या गोष्टींचा करा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 3:56 PM

1 / 7
1. पचनक्रिया सुधारण्यासाठी पपई हे फळ महत्त्वपूर्ण कामगिरी निभावते. पचनक्रियेमध्ये झालेला बिघाड पपईचे सेवन केल्यास 24 तासांच्या आत सुधारते.
2 / 7
दहीमध्ये असलेले रासायनिक गुणधर्म अन्नपदार्थ पचवण्यास मदत करतात. अपचन, बद्धकोष्ठता, गॅसेसच्या समस्यास असल्यास एक वाटी दही खावे. या समस्या दूर होण्यास मदत होईल.
3 / 7
केळ्यांमध्ये फायबरचे प्रचंड प्रमाणात असते. केळ्याचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारते. शिवाय, आतड्यांमध्ये होणार जळजळदेखील कमी होते. जेवणानंतर एक केळे खाण्याची सवय लावल्यास ते आरोग्यास फायदेशीर ठरते.
4 / 7
हळदीमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. कोमट पाण्यामध्ये कच्ची हळद मिसून प्यावे. गॅसेसचा त्रास कमी होतो
5 / 7
अननसमध्ये ब्रोमेलिन एन्जाइम असतात, हे पचनक्रिया उत्तम करण्यास फायदेशीर ठरतात. जेवणानंतर अननस किंवा अननसाच्या रसाचे सेवन करावे.
6 / 7
नारळाच्या तेलामुळे पचनक्रिया सुधारण्यासोबत अपचन, बद्धकोष्ठता, अॅसिडिटीसारखा त्रासही कमी होतो.
7 / 7
पुदिनाच्या सेवनामुळे पोटाला थंडावा मिळतो. बिघडलेली पचनक्रिया सुधारते. पुदिन्याचा रस किंवा पाने चावून खाल्ल्यास पोटातील गॅस, पोटदुखी, पोटाला आतील बाजूनं आलेली सूज इत्यादी समस्या कमी होतात.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स