शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हिमोग्लोबिन कमी झालंय?, 'ही' फळं खाणं ठरेल फायदेशीर; काही दिवसातच दिसेल फरक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 4:01 PM

1 / 10
आपल्या शरीरातील पेशींना ऑक्सिजन पोहोचवण्यात हिमोग्लोबिन महत्त्वाची भूमिका बजावतं. त्याच्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
2 / 10
शरीरामध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आपण काही खास फळांचा आहारात समावेश करू शकतो. अशाच काही फळांबद्दल जाणून घेऊया...
3 / 10
डाळिंबामध्ये आयर्न आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. आयर्न हे हिमोग्लोबिनमधील मुख्य घटक आहे.
4 / 10
सफरचंदातही आयर्न आढळतं. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स देखील असतात ज्यामुळे शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो.
5 / 10
संत्री व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत आहे. व्हिटॅमिन सी हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करतं.
6 / 10
द्राक्षांमध्ये आयर्नबरोबरच कॉपरही आढळते. हिमोग्लोबिनच्या निर्मितीमध्येही कॉपरची भूमिका महत्त्वाची असते.
7 / 10
किवीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. याशिवाय यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सही आढळतात.
8 / 10
चेरीमध्ये आयर्न आणि कॉपर दोन्ही आढळतात. हे दोन्ही हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करतात.
9 / 10
बोरांमध्ये आयर्नसोबतच व्हिटॅमिन सी देखील आढळतं. हे दोन्हीही हिमोग्लोबिनसाठी फायदेशीर आहे.
10 / 10
या फळांचा आहारात समावेश करण्यासोबतच संतुलित आहार घेणंही खूप गरजंचे आहे. हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे.
टॅग्स :Hemoglobinहिमोग्लोबीनHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स