प्रमाणापेक्षा अधिक कोलेस्ट्रॉल वाढवतात हे ८ पदार्थ, रोजच खातो...; खायच्या आधीच पहा ना... By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 5:21 PM
1 / 8 शरीरात कोलेस्टेरॉल वाढत असेल तर हलक्यात घेण्याची चूक करू नका. कोलेस्टेरॉल वाढवणाऱ्या गोष्टी खाल्ल्याने प्रसंगी हार्ट अटॅक येण्याची शक्यता अधिक असते. हृदयातून किंवा हृदयाला होणारा रक्तपुरवठा थांबू शकतो. असे झाले तर ते ब्लॉकेज काढण्यासाठी रक्तवाहिन्यांना स्टेंट लावण्याची वेळ येते. यामुळे कोलेस्ट्रॉल वाढवणाऱ्या गोष्टी कोणत्या, त्यांचे सेवन केले नाही तर फायद्याचे ठरणार आहे. 2 / 8 जर तुम्हाला कोलेस्टेरॉल कमी करायचं असेल तर सर्वप्रथम अशा गोष्टींपासून दूर राहा ज्यामुळे हा घाणेरडा चिकट पदार्थ वाढतो. कारण, हे पदार्थ खाल्ल्याने शरीरात LDL (Low Density Lipoprotein) वाढते. 3 / 8 उच्च कोलेस्ट्रॉल शिरांमध्ये जमा होते आणि रक्ताच्या वहनाला अडथळा ठरू लागले. सीडीसीच्या मते, जेव्हा खराब कोलेस्टेरॉल हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांना प्रभावित करते तेव्हा कोरोनरी आर्टरी डिसिज होतो. यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. या नसा उघडण्यासाठी कोरोनरी अँजिओप्लास्टीनंतर स्टेंट टाकला जातो. 4 / 8 नाश्त्यात बटरसोबत ब्रेड खायला कोणाला आवडत नाही. परंतू, एसीपी जर्नल्सच्या संशोधनानुसार, हे लोणी शिरांमध्ये जमा होते. लोण्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्तीचे कोलेस्ट्रॉल असते. यामुळे लोण्याचे पदार्थ टाळावेत. 5 / 8 तुम्ही जर आईस्क्रीमचे शौकीन असाल तर सावध व्हा. USDA म्हणते की 100 ग्रॅम व्हॅनिला आइस्क्रीम खाल्ल्याने 41 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल शरीरात जाते. जे हृदयासाठी खूप धोकादायक आहे. 6 / 8 बहुतांश लोक चहासोबत बिस्किटे खातात, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकते. ऑस्ट्रेलियाच्या सरकारी आरोग्य वेबसाइटनुसार, बिस्किट एक प्रक्रिया केलेले अन्न आहे ज्यामध्ये संतृप्त चरबी असते. या चरबीपासून कोरोनरी आर्टरी डिसीज होऊ शकतो. 7 / 8 फ्रिटर आणि तळलेले चिकन यासारख्या गोष्टी खोल तळलेल्या पदार्थांच्या श्रेणीत येतात. या पदार्थांमध्ये सर्वात वाईट प्रकारची चरबी असते, ज्याला ट्रान्स फॅट्स म्हणतात. एलडीएल कोलेस्ट्रॉल वाढण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे. 8 / 8 बर्गर, पिझ्झा, पास्ता इत्यादी जंक फूड आहेत. जे बनवण्यासाठी बटर, क्रीम, चीज आणि इतर कृत्रिम घटक वापरले जातात. या सर्व गोष्टी शिरांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे काम करतात, त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहा. आणखी वाचा