शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'हे' आहेत लिची खाण्याचे फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2018 2:03 PM

1 / 11
आपल्या आरोग्यासाठी फळे ही सर्वात उत्तम हे आता सर्वांनीच मान्य केले आहे. फळांच्या सेवनाने आपल्या शरिराला अनेक महत्त्वाचे घटक मिळतात. तसेच त्वचेच्या स्वास्थासाठीही फळांचा फार उपयोग होतो. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत लिची खाण्याचे आरोग्यदायी फायदे...
2 / 11
लिची हे लहानसे फळ परंतु चवीला अत्यंत चविष्ठ असते. लिचीमध्ये भरपूर प्रमाणात पाण्याची मात्रा असते. याव्यतिरिक्त कार्बोहाईड्रेट, व्हिटॉमिन ए, व्हिटॉमिन सी, बी कॉम्प्लेक्स, पोटॅशियम, कल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फॉरस, आयर्न यांसारखे पोषक घटक असतात.
3 / 11
लिचीमध्ये शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असे पोषक घटक असतात. लिचीमध्ये बीटा कॅरोटीन, नियासिन, रायबोफ्लेविन आणि फॉलेट सारखी तत्वे मोठ्या प्रमाणावर असतात.
4 / 11
लिची खाल्याने आपली पचनक्रिया सुधारण्यासही मदत होते. कारण लिचीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात. पोटाच्या सर्व विकारांवर लिची खाणे हा अगदी फायदेशीर उपाय आहे.
5 / 11
लिचीमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असल्याने शरिरातील डिहायड्रेशन दूर करून पाण्याची पातळी वाढवण्यासाठी लिचीचा उपयोग होतो.
6 / 11
लिचीमध्ये पोटॅशिअम आणि सोडिअमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे शरिरातील रक्तवाहिन्यांमधून रक्ताचा प्रवाह योग्य रितीने होण्यास मदत होते आणि ब्लड प्रेशरवर नियंत्रण राहते.
7 / 11
लिचीत बीटा कॅरोटीन आणि ओलीग्रोनोल असते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत होते. हृदयासंबंधित समस्या असलेल्यानांनी आहारात लिचीचा समावेश अवश्य करावा.
8 / 11
त्वचेचे आरोग्य राखण्यातही लिचीतील पोषक तत्वे मदत्त्वाची भूमिका बजावतात. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असून ते अॅन्टीऑक्स‍िडेंट फायटींगसारखे काम करतात. यामुळे त्वचेवर पुरळ किंवा डाग येते नाहीत.
9 / 11
लिची खाल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी लिचीचा आहारात जरुर समावेश करावा. लिचीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर असल्याने वजन नियंत्रित राहण्य़ास मदत होते. सकाळच्या वेळेस लिची खाल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि भूकही कमी लागते.
10 / 11
कॅन्सरसारख्या रोगापासून बचाव करण्यासाठीही लिचीचा उपयोग होतो. एका संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, लिचीमध्ये कॅन्सरशी लढण्याचे गुमधर्म अधिक प्रमाणात असतात.
11 / 11
लिचीमध्ये कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमचे प्रमाण अधिक असते. जे आपल्या शरिराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असल्याने हाडे मजबूत करण्यासाठी लिचीची मदत होते.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स