These are the benefits of ghee eating!
तूप खाण्याचे 'हे' आहेत फायदे ! By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 9:29 PM1 / 7अनेकदा डाएट करताना आपण तूपाचे पदार्थ खाणं टाळतो. पण तुम्हाला माहीत आहे का? तूप हा पौष्टिक आहारातील महत्वाचा घटक आहे. तूप खाल्याने शरीराचे आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते. जाणून घेऊयात तूप खाल्याने शरीराला होणारे फायदे...2 / 7त्वचा तजेलदार बनवण्यासाठी तूप अत्यंत फायदेशीर ठरते. तूपातील पौष्टिक घटक त्वचेचा कोरडेपणा दूर करून ती तजेलदार ठेवण्यासाठी मदत करतात.3 / 7तूपामध्ये व्हिटामिन ए, डी आणि कॅल्शियम, फॉस्फरस, मिनरल्स, पोटॅशिअम यांसारखी अनेक पोषक तत्वे असतात. यामुळे सांधेदुखीचा त्रासही कमी होतो.4 / 7तूप डोळ्यांसाठी फार फायदेशीर ठरते. ग्लुकोमा (काचबिंदू) रूग्णांसाठीही तूप फायदेशीर ठरते.5 / 7आयुर्वेदात सांगितल्यानुसार तूप खाल्याने स्मरणशक्ती वाढते त्याचप्रमाणे मेंदूची कार्यक्षमता वाढविण्यासाठी तूप फायदेशीर ठरते.6 / 7तुम्ही गॅसच्या त्रासाने हैराण झाला असाल तर तूप खाणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे जेवणात तूपाचा समावेश करणे फायदेशीर ठरते.7 / 7तूपामध्ये तेलापेक्षा अधिक पोषक तत्व असतात. बटर पेक्षा तुपाचे सेवन करणे अधिक चांगले असते. तुप घरी तयार करणं अधिक उत्तम ठरते. आणखी वाचा Subscribe to Notifications