शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फुफ्फुसांसाठी वरदान आहेत 'हे' सुपरफुड्स! तुमची फुफ्फुसं राहतील फीट अँड फाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 12:42 PM

1 / 10
तुमच्या फुफ्फुसांचे कार्य उत्तम राखण्यासाठी मुबलक पाण्याची गरज असते. रोज ८ ग्लास पाणी प्या. यामुळे फुफ्फुस स्वच्छ होतील आणि तुमचे आरोग्य सुधारेल.
2 / 10
.हळद-भारतीय व दक्षिण आशियायी भागात स्वयंपाकासाठी प्राचीन काळापासून हळद हा मसाल्याचा पदार्थ वापरण्यात येतो. हळद अँटीऑक्सिडंट,अँटीइन्फ्लेमेंटरी, अँटीबायोटिक व रोग प्रतिकारशक्ती वाढवणारी असते. हळदीमध्ये असलेल्या क्युरुमिन (Curcumin) या घटकामुळे अति धुम्रपानामुळे फुफ्फुसांमध्ये साठणारा प्लॅग (Plaque) कमी होतो ज्यामुळे फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.
3 / 10
टॉमेटोमध्ये व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे शरीरातील एन्झाइमची निर्मिती वाढते. या्मुळे फुफ्फुसांमधून संपूर्ण शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होतो.
4 / 10
ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असतात विशेषत: EGCG (epigallocatechin) म्हणून ओळखला जाणारा कॅटेचिन हा घटक असतो. यामध्ये फुफुसांना कॅन्सरच्या घटकांपासून संरक्षण देणारे घटक देखील असतात.
5 / 10
ब्रॉकोर्ली सारख्या भाज्या आहारात असल्यास शरीरातील ग्लुकोसिनॉलेट (Glucosinolate) निर्मितीत वाढते ज्याचा फायदा फुफ्फुसांमधील टॉक्सिन बाहेर टाकण्यास होतो.
6 / 10
लसणामधील अँटिइन्फेमेंटरी व इम्युन बिल्डींग प्रॉपर्टीजमुळे अस्थमा व फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.
7 / 10
संत्री अथवा लाल रंगाच्या फळांमध्ये आढळणारे नारिंगी रंगाचे अँटिऑक्सिडन्ट पिगमेंट अथवा रंगद्रव्य फुफ्फुसांना होणा-या कर्करोगाचा धोका कमी करते.
8 / 10
हिरव्या पालेभाज्यांमध्ये मॅग्नेशियम व पोटॅशियम मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे फुफ्फुसे निरोगी रहाण्यास मदत होते.यासाठी आहारात पालक,लेट्यूस,कोबी,मस्टर्ड ग्रीन,पातीचा कांदा,गव्हाकुंर,पुदिना व कोथिंबिरीची पाने यांचा समावेश करा.
9 / 10
आले हे देखील पचन व रक्ताभिसरणाला चालना देणारा एक पदार्थ आहे. आल्याचा फुफ्फुसांचे कार्य सुधारण्यासाठी देखील फायदा होतो.
10 / 10
सफरचंदामध्ये पेक्टिन (Pectin),व्हिटॅमिन,फ्लेवोनॉइड व केमिकल घटक असतात. फ्लेवोनॉइड मुळे श्वसनव्यवस्था देखील निरोगी रहाते. फुफ्फुसांचे कार्य सुरळीत राहते.
टॅग्स :Healthआरोग्य