These are the symptoms of protein deficiency in body and protein rich food
शरीरात प्रोटीनची कमतरता आहे हे कसं ओळखाल? जाणून घ्या काही लक्षणे... By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 4:54 PM1 / 11हेल्दी शरीरासाठी प्रोटीन फार गरजेचं तत्व आहे. हे आपल्या मसल्स, त्वचा, एन्जाइम्स आणि हार्मोन्ससाठी एका बिल्डींग ब्लॉगप्रमाणे काम करतं. इतकंच नाही तर प्रोटीन सर्वच बॉडी टिश्यूच्या निर्माणासाठी एक महत्वाचं तत्व म्हणून काम करतं. अशात जेव्हा शरीराच्या गरजेनुसार पुरेशा प्रमाणात प्रोटीन इंटेक होत नाही तेव्हा याला प्रोटीन डिफिशिएन्सी म्हटलं जातं. हेल्थलाइन या हेल्थ वेबसाइटनुसार, जगभरात साधारण एक अब्ज लोकांना प्रोटीन डिफिशिएन्सीची समस्या आहे. यातील जास्तीत जास्त लोक सेंट्रल आफ्रिका आणि साउथ आशियातील आहेत. ही समस्या सामान्यपणे लहान मुलांमध्ये, वयोवृद्धांमध्ये आणि रूग्णांमध्ये बघायला मिळते.2 / 11प्रोटीनच्या कमतरतेची लक्षणे - तुमच्य चेहऱ्यावर, त्वचेवर, पोटात इत्यादींमध्ये सूज येऊ शकते. ही समस्या होत असेल तर तुमच्य शरीरात प्रोटीनची कमतरता असू शकते.3 / 11- अनेक प्रयत्न करूनही केसांची सुंदरता टिकत नसेल आणि केस रखरखीत, निर्जिव होत असतील तर ही प्रोटीनच्या कमतरतेची लक्षणे आहेत.4 / 11- शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर मांसपेशी आपली गरज भागवण्यासाठी हाडांमधील प्रोटीन शोषूण घेतात. याने हाडे कमजोर होऊ लागतात. मांसपेशींना अधिक ऊर्जा खर्च करावी लागते. यामुळे मसल्समध्ये वेदना होण्याची समस्याही होते.5 / 11- प्रोटीनच्या कमतरतेमुळे सतत थकवा जाणवतो. प्रोटीन आपल्या शरीरात इंधनासारखं काम करतं आणि याच्यामुळेच शरीराला एनर्जी मिळते. 6 / 11- जर तुम्ही लगेच आजारी पडता आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर याचं कारणही प्रोटीनची कमतरता आहे.7 / 11- अनेकदा काही लोकांचं शरीर अचानक फूगलेलं आणि लठ्ठ दिसू लागतं. ज्याचं कारण प्रोटीनची कमतरता असू शकतं. प्रोटीनच्या कमतरतेमुळे पुरेशी ऊर्जा शरीराला मिळत नाही आणि ज्यामुळे ऊर्जा निर्माण करण्यात अतिरिक्त तणाव होतो.8 / 11- जर शरीरात पुसेसं प्रोटीन नसेल तर संक्रमित रोग आणि बॅक्टेरिया-व्हायरससहीत अनेक गंभीर आजार होतात.9 / 11- प्रोटीनच्या कमतरतेमुळे लहान मुलांची उंची वाढणं थांबतं. त्यामुळे प्रोटीन रिच फूड लहान मुलांच्या आहारात नक्की सामिल करा.'10 / 11- प्रोटीनच्या कमतरतेमुळे हीलिंग प्रक्रिया कमी होते. शरीरात रक्ताचा प्रभाव प्रभावित होतो आणि नवीन कोशिकांच्या निर्माणात उशीर होतो.11 / 11किती प्रोटीन गरजेचं? - हेल्थलाइन वेबसाइटनुसार प्रत्येकाच्या गरजेनुसार शरीराला प्रोटीनची गरज असते. उदाहरण द्यायचं तर बॉडी वेट, फिजिकल अॅक्टिविटी, वय इत्यादी. एका रिसर्चमधून समोर आलं की, प्रोटीनची सर्वात जास्त गरज वयोवृद्धांना आणि खेळाडूंना असते. आणखी वाचा Subscribe to Notifications