These common foods can be very dangerous they can kill you
सावध व्हा! 'या' पदार्थांमुळे जीवाला धोका By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 3:21 PM1 / 6चेरी आरोग्यासाठी फायदेशीर असली, तरी त्यामुळे अनेक धोके निर्माण होऊ शकतात. चेरीच्या बीमध्ये हायड्रोजन सायनाईड असतं. यामुळे श्वास घेण्यास त्रास निर्माण होऊ शकतो. याशिवाय डोकेदुखी, उलट्या, उच्च रक्तदाब असे त्रास होऊ शकता. 2 / 6मशरुमसुद्धा शरीरासाठी घातक ठरू शकतं. जगातील मशरुमच्या 100 जाती या कमी विषारी आहेत. तर 12 जाती या अतिशय विषारी आहेत. या मशरुममुळे मृत्यूदेखील होऊ शकतो. 3 / 6सुपारी जास्त प्रमाणात खाल्ल्यास शरीरासाठी धोकादायक ठरु शकते. यामुळे मळमळ, डिहायड्रेशन, उलट्या असे त्रास होऊ शकतात.4 / 6बटाट्यामध्ये सोलानाईन हा विषारी पदार्थ असतो. यामुळे मज्जातंतूसह पचन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. सोलानाईनमुळे मळमळ, डोकेदुखी, अशक्तपणा, अतिसार, उलट्या असे त्रास होऊ शकतात. 5 / 6कच्च्या काजूमध्ये उरुशियॉल नावाचं रसायन असतं. त्यामुळे जास्त काजू खाल्ल्यास शरीराला धोका निर्माण होऊ शकतो. 6 / 6बदाम दोन प्रकारचे असतात. कडू आणि गोड. यातील कडू बदामांमध्ये ग्लॅकोसाइड अमेग्डलन असतं. एका कडू बदामात 6 मिली ग्रॅम हायड्रोजन सायनाइड असतं. 100 ग्रॅम हायड्रोजन सायनाइड पोटात गेल्यास मृत्यू होऊ शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications