शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रोजच्या चुकांमुळे कमी होत आहे रोगप्रतिकारकशक्ती; माहीत करून घ्या आहाराबात 'या' गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 4:41 PM

1 / 9
कोरोनाच्या माहामारीने जगभरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार केलं आहे. हळूहळू स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. तसंच सरकारी नियमांचे आणि स्वच्छतेचे पालन करणं गरजेचं आहे. कोरोनासोबत चांगलं आरोग्य ठेवून जगायचं असेल सगळ्याच महत्वाचं म्हणजे रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवायला हवी. आहारात काही पदार्थांचा समावेश सतत केल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊ शकते. त्याचे सेवन करणं टाळल्यास आरोग्य चांगले राहील.
2 / 9
मादक पदार्थ : मादक पदार्थांच्या अतिसेवनाने रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होते. तसंच किडन्या खराब होण्याची शक्यता असते. शरीर रोगांशी सामना करू शकत नाही. म्हणून इन्फेक्शनपासून लांब राहायचं असल्यास मादक पदार्थाचे सेवन करू नका.
3 / 9
शिळे अन्न : सध्या पावासाळ्याचे दिवस आहेत. आजार पसरण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे शक्यतो ताजे आणि गरम अन्न खाण्याचा प्रयत्न करा. जास्तीचे जेवण तयार करू नका. म्हणजे तुम्हाला शिळं खावंही लागणार नाही आणि अन्न वायाही जाणार नाही.
4 / 9
प्रोसेस्ड् फुड: प्रोसेस्ट फुडचे अतिप्रमाणात सेवन केल्याने रोगप्रतिकारकशक्ती कमी होण्याची शक्यता असते. कारण त्यातून कोणतेही पोषक घटक शरीराला मिळत नसतात.
5 / 9
कॅफिन : तुम्हाला चहा किंवा कॉफी प्यायची सवय असेल तर एकदा किंवा दिवसातून दोनदा पिणं ठिक आहे. सतत जर तुम्ही कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन करत असाल तर एसिडीटी, छातीत जळजळणं अशा समस्या होण्याची शक्यता असते.
6 / 9
मीठ : ब्लॉकेजेसमुळे होणारे हृदयविकार हेही अतिमिठाचे परिणाम आहेत. रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आले तर हृदयाला रक्तपुरवठा होत नाही. त्याचा परिणाम म्हणून हार्ट अटॅक येतो. उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्यांना सूज येते. त्यामुळे त्या पुरेसा रक्तपुरवठा हृदयाला करू शकत नाही. आहारात मिठाचं प्रमाण प्रमाणबद्ध किंवा कमी ठेवून हृदयविकाराचा हा धोका आटोक्यात ठेवू शकतो.
7 / 9
कोल्ड्रींग: थंड पेयांमुळे पचनक्रिया मंदावते. खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे आजारांचा सामना करावा लागू शकतो. जास्त प्रमाणात सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती कमी होते. पोटाचे विकार उद्भवतात. म्हणून अशा पेयांपासून दूर राहा.
8 / 9

9 / 9

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स