शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नसा मजबूत करण्यासाठी खास पदार्थ, शरीरात कधीच थांबणार नाही रक्तप्रवाह

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 9:52 AM

1 / 8
शरीरातील प्रत्येक भागात रक्त, ऑक्सिजन आणि पोषक तत्व पोहोचवण्याचं काम रक्तवाहिन्या करतात. जसजसं आपलं वय वाढतं या रक्तवाहिका कमजोर होऊ लागतात. ज्यामुळे त्या योग्य गोष्टी शरीराच्या प्रत्येक भागात पोहोचवण्यास असमर्थ होऊ लागतात, ज्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागतो. मात्र, अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचं सेवन करून तुम्ही वाढत्या वयातही रक्तवाहिन्या मजबूत करू शकता. चला जाणून घेऊया...
2 / 8
बेरीज - बेरीजमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असतं, खासकरून यात एक असं अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आढळतं ज्याला एंथोसायनिन म्हटलं जातं. जे रक्तवाहिन्यांचं काम चांगलं करण्याचं काम करतं. ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, रसबेरी आणि ब्लॅकबेरीमध्ये एंथोसायनिनचं प्रमाण अधिक असतं.
3 / 8
पालेभाज्या - हिरव्या पालेभाज्या जसे की, पालक यात भरपूर प्रमाणात नायट्रेट असतं. जे ब्लड फ्लो चांगलं करण्यासाठी आणि ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करतं. तसेच या व्हिटॅमिन के चं प्रमाणही अधिक असतं, ज्यामुळे धमण्या कठोर होत नाहीत.
4 / 8
एवोकाडो - एवोकाडो मोनोअनसॅच्युरेटेड फॅटचा एक चांगला सोर्स मानलं जातं. जे रक्तवाहिन्यांचं काम चांगलं करतं आणि सूज कमी करण्यासही मदत करतं. यात पोटॅशिअमचं प्रमाण अधिक असतं, ज्याने ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत मिळते.
5 / 8
कडधान्य - कडधान्य जसे की, ब्राउन राइस, क्विनोओ आणि गव्हापासून तयार ब्रेडमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येतं. जे कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यास आणि रक्तवाहिन्याचं काम सुधारण्यास मदत करतं. कडधान्यामध्ये व्हिटॅमिन बी सुद्धा असतं ज्याने धमण्या कठोर होत नाहीत.
6 / 8
कांदा - कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात फ्लेवोनॉइड हे अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट असतं. हे आपल्या एकूणच आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं आणि शरीरात सर्कुलेशन वाढवतं. अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटसोबतच कांद्यामध्ये अ‍ॅंटी इंफ्लेमेटरी गुणही आढळतात जे नसा आणि धमण्यांवरील सूज कमी करतं.
7 / 8
हळद - जुन्या काळात अनेक उपचारांसाठी हळदीचा वापर केला जात होता. हळदीचं सेवन केल्याने रक्तवाहिन्या आकुंचण वापत नाहीत आणि सर्कुलेशनही चांगलं राहतं.
8 / 8
टोमॅटो - टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात लायकोपीन नावाचं अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट असतं. टोमॅटोमध्ये ही अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट रक्तवाहिन्यांचं काम सुधारण्यास आणि त्यावरील सूज कमी करण्यास मदत करतं. सोबतच टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर आढळून येतं जे धमण्यांना कठोर होऊ देत नाही.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य