Bad cholesterol: या पदार्थांमुळे वाढतं बॅड कोलेस्ट्रॉल, आजच खाणं सोडा नाही तर येईल हार्ट अटॅक! By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 11:33 AM
1 / 6 Reduce Bad Cholesterol: सध्या अनेक लोकांना कोलेस्ट्रॉल वाढल्याची समस्या होत आहे. ही समस्या एक कॉमन समस्या बनली आहे जी फार घातक आणि जीवघेणी आहे. कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयरोग आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. तसेच अलिकडे हृदयरोगांमुळे मृत्यूचा दर वाढला आहे. एक्सपर्ट्सनुसार, कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबाबत सांगणार आहोत. ज्यांच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल वाढतं. तुम्ही चांगल्यासाठी या पदार्थांना टाळलं पाहिजे. 2 / 6 अनेक लोकांना तळलेले आणि भाजलेले पदार्थ खाण्याची आवड असते. पण हे फूड्स तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात. तेलकट पदार्थांमुळे ऊर्जेचं घनत्व आणि कॅलरीचं प्रमाण वाढतं. याने कोलेस्ट्रॉल वाढतं. त्याशिवाय तेलकट पदार्थ हार्ट अटॅक, लठ्ठपणा आणि डायबिटीसचा धोकाही वाढवतात. 3 / 6 केक, ब्राउनी आणि आइस्क्रीम खाणाऱ्या लोकांनीही सावध रहायला हवं. या पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट, शुगर आणि इतर रिफाइंड कार्ब असतात. हे शरीरात ट्रायग्लिसराइड आणि कोलेस्ट्रॉल वाढवतात. याने हृदयरोगांचा धोका वाढतो. 4 / 6 सॉसेज, बेकन आणि इतर याप्रकारचे प्रोसेस्ड मीट खाणं टाळलं पाहिजे. या पदार्थांमुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढतं. हे तयार करण्यासाठी जास्त फॅट असलेल्या मीटचा वापर केला जातो. याच्या जास्त सेवनाने हार्ट अटॅक आणि कॅन्सरचा धोका असतो. 5 / 6 बेक करण्यात आलेल्या पदार्थांमध्ये बटर आणि शुगरचं प्रमाण फार जास्त असतं. याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल वाढतं. या पदार्थांमध्ये फार जास्त एलडीएल असतं. ज्याने एथेरोस्क्लेरोसिस होऊ शकतो. याने ब्लड सेल्समध्ये प्लाक जमा होतो. 6 / 6 बेक करण्यात आलेल्या पदार्थांमध्ये बटर आणि शुगरचं प्रमाण फार जास्त असतं. याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल वाढतं. या पदार्थांमध्ये फार जास्त एलडीएल असतं. ज्याने एथेरोस्क्लेरोसिस होऊ शकतो. याने ब्लड सेल्समध्ये प्लाक जमा होतो. आणखी वाचा