these foods you should never order from a kid’s menu
रेस्टॉरंटच्या मेन्यूमधून मुलांसाठी हे पदार्थ कधीच करू नका ऑर्डर By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 3:02 PM1 / 5धकाधकीच्या आयुष्यात आपल्या मुलांना पौष्टिक अन्नपदार्थ खाऊ घालणे हे सध्या प्रत्येक आईवडिलांसाठी एखाद टास्क झाला आहे. विशेषतः एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर आपल्या मुलांसाठी काय ऑर्डर करावं आणि काय करू नये, याकडेही लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे. पण याचे नियोजन करत असताना त्यांचे आरोग्य आणि आहारासोबत अजिबात तडजोड करू नका. 2 / 51. फळांचा रस आणि सोडा : कोणत्याही प्रकारचा सोडा कधीही पौष्टिक नसतो, हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळे फळांचा रस आणि सोडा मिश्रित पेय मुलांना कधीही प्यायला देऊ नका. कार्बोहायड्रेट असलेले पेय आरोग्याच्या दृष्टीनं धोकादायक असते. सोड्यामध्ये कोणतीही पोषक तत्त्वं नसतात. त्यामध्ये केवळ शरीराला हानिकारक अशी साखर आणि कॅलेरीजचा समावेश असतो. शिवाय, रेस्टॉरंटमध्ये मिळणारे फळांचे रसही बऱ्याचदा पौष्टिक नसतात. त्यामुळे पाणी किंवा दूध हेच पर्याय मुलांसाठी चांगले असतात. 3 / 52. बटर पास्ता : कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ मुलांना खायला प्रचंड आवडतात. त्यातही भात आणि ब्रेड हे त्यांचे आवडीचे खाद्यपदार्थ. शिवाय, कमी वेळेत आणि कमी त्रासात हे पदार्थ झटपट तयार होतात देखील. पण यामुळे पोषक घटक मिळत नाही. त्यामुळे काही कडधान्यांऐवजी सर्व कडधान्यांचा आहारात समावेश करावा. 4 / 53. मिष्ठान्न : गोड पदार्थ खाणं ही वाईट सवय नाही. पण मिष्ठान्नांचा आहारात अतिरेक होता कामा नये. कारण मिष्ठान्न शरीरासाठी हानिकारक असतात. आईस्क्रीम, ब्राऊनी यांसारख्या गोड पदार्थांमध्ये साखर आणि प्रचंड प्रमाणात कॅलरीज असतात. लहान मुलांच्या शारीरिक विकासावर यामुळे वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपल्या मुलांना खूप प्रमाणात मिष्ठान्न खाण्याची परवानगी देऊ नये. 5 / 54.बर्गर : बर्गर तर लहान मुलांचा अतिशय आवडता पदार्थ. पण मुलांची भूक भागवण्यासाठी चीज बर्गर हा अतिशय वाईट आणि आरोग्यास हानिकारक असा पर्याय आहे. बर्गरऐवजी तुम्ही ग्रिल्ड सँडविच किंवा फळं हा मेन्यू मुलांसाठी निवडू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications