शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 12:06 PM

1 / 7
पोट फुगण्याची समस्या ही अनेकांसाठी डोकेदुखी ठरत असते. अनेकदा चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे एक्सरसाईज केल्यावरही पोट फूगलेलं असतं. याला मेडिकल भाषेत ब्लोटिंगही म्हणतात. पण ही पोट फुगण्याची समस्या का होते? आणि घरगुती उपायांनी ही समस्या कशी दूर केली जाऊ शकते हे आज आपण जाणून घेऊया.
2 / 7
काय आहे कारण? - ब्रेड, डेअरी उत्पादने आणि मांसाहार, एखाद्या पदार्थाची अॅलर्जी असेल, प्रोटीन पचन्यासाठी येणारी अडचण, डिहायड्रेशन, शरीरात फ्लूईड रिंटेशन, मासिक पाळी असताना हार्मोन्समधील बदल इत्यादी.
3 / 7
जर तुम्ही पोट फुगण्याच्या समस्येने हैराण असाल तर सकाळी उठल्यावर काहीही सेवन करण्यापूर्वी गरम पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यावे. जर तुम्हाला लिंबू पाणी प्यायचे नसेल तर ग्रीन टीमध्ये लिंबू टाकून सेवन करु शकता आणि याचं सेवन तुम्ही ब्रेकफास्ट दरम्यानही करु शकता.
4 / 7
जर तुम्हाला दूध किंवा दुधापासून तयार पदार्थ खाल्यावर पोट दुखणे किंवा पोट फुगण्याची समस्या होत असेल तर डेअरी उत्पादने टाळावीत. पोट फुगण्याच्या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर दूध, दही, चीज, पनीर या पदार्थांचं सेवन बंद करा.
5 / 7
फायबर हे असं पोषक तत्व आहे जे वजन कमी करण्यास मदत करतं. पण तुम्हाला फायबरची जास्त सवय नसेल तर किंवा आहारातून फायबर फार कमी घेत असाल तर तुम्हाला पोट फुगण्याची समस्या होऊ शकते. याचा अर्थ असा होतो की, तुमच्या आतड्यांना योग्य बॅक्टेरिया मिळत नाहीये. जे फायबरला प्रोसेस करण्यास मदत करतात.
6 / 7
पोट फुगण्याची समस्या असेल तर पपई आणि अननस खाल्याने तुमची ही समस्या दूर होऊ शकते. पपईमध्ये पॅपेन आणि अननसमध्ये ब्रोमेलेन असतं जे प्रोटीनला डायजेस्ट करण्यास मदत करतं.
7 / 7
तुम्हाला असंही वाटू शकतं की, जास्त पाणी प्यायल्याने तुमचं पोट फुगलं असेल. पण शरीराला भरपूर पाण्याची गरज असते. खासकरुन गरमीच्या दिवसात पाणी भरपूर प्यावं. जेवण केल्यावर घराबाहेर पडणार असाल तर भरपूर पाणी प्यावे.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य