शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गरम किंवा कोमट पाणी पिण्याचे गंभीर नुकसान, दुर्लक्ष कराल तर डॉक्टरकडे जाण्याची येईल वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2024 10:57 AM

1 / 7
Hot or Lukewarm Water Side Effects : हिवाळा सुरू होताच जास्तीत जास्त लोक कोमट किंवा गरम पाणी पिण्यावर अधिक भर देतात. कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, तसेच शरीरातील विषारी पदार्थ सुद्धा बाहेर पडतात. असे अनेक महत्वाचे फायदे असूनही गरम किंवा कोमट पाणी प्यायल्याने शरीरात इनेक गंभीर समस्या सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोमट पाणी पिण्याचे साइड इफेक्ट्स सांगणार आहोत.
2 / 7
जास्तीत जास्त लोक गरम किंवा कोमट पाणी पितात. पण अनेकांना हे पाणी पिण्याचे नियम माहीत नसतात. जर हे नियम पाळले गेले नाही तर तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येऊ शकते. एक्सपर्ट सांगतात की, खालील काही समस्या असलेल्या लोकांनी सामान्य तापमानाचं पाणी प्यावं.
3 / 7
शरीरात डिहायड्रेशन झालं तर अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. एका रिसर्चनुसार, हायड्रेशनसाठी सगळ्यात बेस्ट १६ डिग्री सेल्सिअस तापमानाचं पाणी प्यावं, जे सामान्य पाणी असतं. गरम किंवा कोमट पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या वाढते. आधीच डिहायड्रेशनची समस्या असेल आणि तुम्ही कोमट पाणी पित असाल तर स्थिती गंभीर होऊ शकते.
4 / 7
जर तोंडात फोड आले असतील किंवा घशातून एखाद्या कारणाने रक्त येत असेल तर गरम किंवा कोमट पाणी टाळलेलं कधीही चांगलं. अशा स्थितीत थंड पाणी प्यावं. याने ब्लीडिंग थांबेल.
5 / 7
एक्सपर्ट्स सांगतात की, नेहमीच गरम पाणी प्यायल्याने पोटाच्या आतील नाजूक भाग डॅमेज होऊ शकतो. यामुळे पोटात गॅस्ट्रिक अल्सर होण्याचाही धोका असतो.
6 / 7
अ‍ॅसिडिटीची समस्या नेहमीच होत असेल तर अशा लोकांनी चुकूनही गरम किंवा कोमट पाणी पिऊ नये. कारण याने त्यांना अॅसिड रिफ्लक्सची समस्या होऊ शकते. अशात या लोकांनी साधं पाणी प्यावे.
7 / 7
ताप आल्यावर शरीराचं वाढलेलं तापमान आणि घाम जात असल्याने डिहायड्रेशनची समस्या होते. अशात ताप असल्यावर साधं पाणी प्यावे. जेणेकरून शरीरात डिहायड्रेशनची समस्या होणार नाही. तापात जास्त थंड आणि जास्त गरम पाणी अजिबात पिऊ नये.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य