'These' problems arise due to excessive consumption of garlic ...
जास्त प्रमाणात लसूण खाल्ल्याने 'या' समस्या उद्भवतात... By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 8:14 PM1 / 6लसूण जेवणाला स्वादिष्ट बनवण्यासोबतच त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. वेगवेगळ्या आजारांच्या उपचारासाठी याचा औषध म्हणून वापर वर्षानुवर्षे केला जातो. लसणाची एक कळी अनेक आजारांवर रामबाण उपाय सांगितली जाते. मात्र लसणाचे अनेक फायदे असण्यासोबतच काही समस्या सुद्धा उद्भवू शकतात. अधिक प्रमाणात लसणाचं सेवन केल्याने काय समस्या होऊ शकतात ते जाणून घेऊया.....2 / 6त्वचेचं नुकसान : काही लोक हे चेहऱ्यावर लसणाची पेस्ट लावतात. पण हे काहींसाठी नुकसानकारक ठरु शकतं. काहींसाठी असं हे चांगलं असलं तरी काहींना यामुळे चेहऱ्यावर जळजळ होण्याचा त्रास होऊ शकतो. 3 / 6सर्जरी : लसणामुळे रक्ताचा संचार अधिक वेगाने होतो. त्यामुळे सर्जरीच्या कमीत कमी दोन आठवड्यांपूर्वी लसणाचं सेवन करु नये. त्यामुळे सर्जरीमध्ये अनेक अडचणी येण्याची शक्यता असते.4 / 6ब्लीडिंग डिसऑर्डर : ताजा लसूण तुमची ब्लीडिंगची समस्या वाढवू शकतो. त्यामुळे ब्लीडिंग डिसऑर्डरच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी लसणाचं सेवन योग्य प्रमाणातच करायला हवं.5 / 6हृदयासाठी घातक : अनेक संशोधनानुसार, लसूण खाल्लाने रक्तातील कोलेस्ट्रॉल स्तरात कमतरता आढळली आहे. असेही आढळले आहे की, लसणाच्या अधिक सेवनामुळे हृदय विकाराचा धक्काही आला आहे.6 / 6पोट आणि पचनक्रियेत समस्या : कशातही मिश्रीत न करता तसाच कच्चा खाल्लेल्या लसणामुळे पोटात दुखणे, भूक कमी लागणे, गॅस, उलटी होणे, पोटात-छातीत जळजळ होणे, डायरिया अशाप्रकारच्या समस्या होऊ शकतात. आणखी वाचा Subscribe to Notifications