these seeds are superfoods, know the benefits of eating seeds
'या' बियांमध्ये इतके पौष्टिक गुणधर्म की तुमच्या शरीराला आजार शिवणारही नाहीत By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 1:35 PM1 / 11चिया बियांमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम आढळते. ओमेगा-३ फॅटी अॅसिडसह भरपूर खनिजे देखील या लहान बियांमध्ये आढळतात.2 / 11तीव्र बद्धकोष्ठतेच्या आजाराने ग्रस्त लोकांसाठी या बिया फायदेशीर ठरतात. त्याशिवाय आपले वजन कमी करण्यासाठीही या बियांचा फायदा होतो.3 / 11पूर्वीपासूनच आहारात अळशीचा समावेश करण्याची आपली परंपरा आहे. अळशीत व्हिटॉमिन बी १, प्रोटीन, मॅग्नेशियम, ओमेगा-३ फॅटी अॅसिड ही पोषकतत्त्वे मुबलक प्रमाणात असतात.4 / 11अळशीच्या सेवनाने ब्रेस्ट कॅन्सर आणि कोलोरेक्टल कॅन्सर होण्याची संभावना कमी होते. अळशीत ओमेगा-३ फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असल्याने ट्युमर होण्यापासून आणि वाढण्यापासून संरक्षण होते.5 / 11भांग बिया ज्यांना hemp seeds असेही म्हटले जाते, या बिया ओमेगा-३ फॅटी अॅसिड व ओमेगा-६ फॅटी अॅसिडनी समृद्ध असतात. यासोबतच प्रथिने, फायबर आणि आरोग्यासाठी उपयुक्त अँटीऑक्सिडंट या बियांमध्ये असते. ज्यामुळे असंख्य आजारांची लक्षणे कमी होऊ शकतात जसे की ह्रदय रोग,त्वचा चे रोग व हाडांचे आजार.6 / 11भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने शरीरातील व्हिटॅमिन ई आणि झिंकची कमतरता भरून निघते. ‘व्हिटॅमिन ई’ त्वचेच्या आरोग्यासाठी लाभदायक असते. या जीवनसत्त्वामुळे त्वचा निरोगी आणि सुंदर राहण्यास मदत मिळते.7 / 11भोपळ्याच्या बियांमुळे शरीरातील लाल रक्त पेशींची संख्या वाढवण्यासही मदत मिळते. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी देखील संतुलित राहते आणि आपल्या आरोग्यावर हानिकारक बॅक्टेरिया आणि व्हायरसमुळे दुष्परिणाम होत नाहीत.8 / 11छोट्याशा दिसणाऱ्या तिळात पौष्टिकता मात्र भरपूर आहे. त्यामुळेच हजारो वर्षांपासून आपण तीळ आणि तिळाचं तेल वापरत आलो आहोत. 9 / 11तिळात कॅल्शियम आहे, ते आपल्या सर्वांना माहीतच आहे. याशिवाय मँगनीज, लोह, फॉस्फरस, सेलेनियम, ब गटातील जीवनसत्त्वे आणि तंतुमय पदार्थही आहेत. तीळातील कॅल्शियम हाडांसाठी चांगलं तर आहेच, तसेच तिळात झिंक जास्त असते, जे हाडांचा ठिसूळपणा रोखण्यास मदत करते.10 / 11सूर्यफुलांच्या बियांमध्ये खनिजे, जीवनसत्त्व आणि प्रथिने असतात जे हाडांना स्वस्थ बनवण्यासाठी मदत करतात. यात जीवनसत्त्व 'ई' आणि बी-कॉम्पलेक्स तसेच मॅग्नेशियमची मात्र मोठ्या प्रमाणावर असते, हे घटक ऑस्टियोपोरोसिस रूग्णांसाठी खूप लाभदायी असतात.11 / 11सूर्यफुलांच्या बियांमध्ये मॅग्नेशियमचा चांगला स्त्रोत असतो. या स्त्रोताचा उपयोग रक्तदाब कमी करण्यासाठी होतो. एका संशोधनानुसार सूर्यफुलांच्या बियांमध्ये असलेले इतर पौष्टिक तत्वांच्या मदतीने मॅग्नेशियम रक्त वाहिन्यांना अरुंद करत रक्त प्रवाह नियंत्रित करतं यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत मिळते. आणखी वाचा Subscribe to Notifications