शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

किचनमधील 'या' गोष्टी अनेक उपचारांसाठी ठरतात स्पेशलिस्ट, मानल्या जातात नॅचलर डॉक्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 10:22 AM

1 / 8
Best Kitchen Ingredients: भारतीय किचनमध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्यांचा अनेक उपचारांमध्ये वापर केला जाऊ शकतो. यातील अनेक गोष्टी शरीराला आतून मजबूत बनवतात आणि अनेक आजारांपासून बचाव करतात. चला जाणून घेऊ कोणती गोष्ट कोणत्या उपचारासाठी आहे बेस्ट...
2 / 8
किचनमध्ये अनेक स्पेशलिस्ट डॉक्टर - किचनमध्ये अनेक मसाले, भाज्या अशा असतात ज्यांचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. पण सोबतच त्यांमध्ये अनेक औषधी गुणही असतात. एखादा पदार्थ हृदय निरोगी ठरतो तर एखादा मेंदू निरोगी ठेवतो. काही असेही असतात जे सगळ्याच आजारांमध्ये उपयोगी पडतात. यांचं नियमित सेवन केलं तर तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याचीही गरज पडणार नाही.
3 / 8
हळद अनेक आजारांवर रामबाण उपाय - हळद त्यातील करक्यूमिनसाठी फेमस आहे. 2017 मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, यात अॅंटी-इन्फ्लामेटरी, अॅंटी मायक्रोबियल गुण असतात. याच्या सेवनाने मेंदूचे आजार, हार्ट अटॅक, कॅन्सर, अल्जायमर, आर्थरायटिस, डिप्रेशन, डायबिटीस आणि वेळेआधीच येणाऱ्या म्हातारपणापासून बचाव करता येतो.
4 / 8
हृदयासाठी बेस्ट आहे लसूण - हृदयाच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी लसूण बेस्ट आहे. यामुळे हृदयाच्या नसा मोकळ्या होतात आणि ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं. एलडीएल कोलेस्ट्रॉल, ट्राइग्लिसराइड आणि प्लाक दूर करण्यातही याने मदत मिळते.
5 / 8
फुप्फुसांसाठी आले - आल्यामध्येही अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी मायक्रोबियल, कार्डियोटॉनिक आणि अॅंटी इंफ्लामेटरी तत्व असतात. याने अस्थमाची लक्षणं, ब्रोंकाइटिस आणि लंग इंफेक्शनपासून बचाव होतो. तसेच आल्यामुळे कफ तोडून बाहेर काढण्यास मदत मिळते.
6 / 8
दालचीनी ठेवेल निरोगी - दालचीनीची साल किंवा पावडरमधील अॅंटी-ऑक्सिडेंट्समध्ये फ्री रेडिकल नष्ट करण्याची क्षमता आहे. दालचीनीमुळे इन्सुलिन सेंसिटिविटीही वाढते. ज्यामुळे डायबिटीसपासून बचाव होतो. याचा वापर केल्यावर वय वाढल्याने मेंदुचं होणारं नुकसानही कमी होतं.
7 / 8
मेंदुचं टॉनिक आहे बदाम - बदामामुळे तुमच्या शरीराची कमजोरी सोबतच मेंदुची कमजोरीही दूर करता येते. यात व्हिटॅमिन ई आणि ओमेगा 3 असतं ज्यामुळे स्मरणशक्ती वाढते. तुम्ही रोज सकाळी 2 ते 3 भिजवलेले बदाम साल काढून खावे.
8 / 8
कांदा हाडे करतो मजबूत - कांदा खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. यामुळे बोन डेंसिटी वाढते आणि 30 वयानंतर महिलांना याचा डाएटमध्ये आवर्जून समावेश करावा. कारण याने ऑक्सीडेटिव स्ट्रेसपासून बचाव होतो तसेच ऑस्टियोपोरोसिसचा धोकाही कमी होतो.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य