शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

साखरेचेच 'हे' प्रकार आहेत आरोग्यवर्धक, शरीराराला आहेत इतके फायदे की वारंवार खाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 2:12 PM

1 / 10
खडी साखर - यामध्ये समृद्ध पोषक घटक असतात. खडीसाखर कॅल्शियम आणि खनिजांनी समृद्ध असते. ती प्रक्रिया केली नसल्याने शरीरास लाभदायक असतात.
2 / 10
जर तुमचा खोकला खूप दिवस बरा होत नसेल, कफ साठून राहिला असेल तर त्यासाठी खडीसाखर हा एक प्रभावी उपाय आहे. जर तुम्हाला असा अशक्तपणा जाणवत असेल तर रक्ताची तपासणी करून हिमोग्लोबिनचे प्रमाण बघितले पाहिजे. ज्यांना ऍनेमियाचा त्रास असतो त्यांच्यासाठी खडीसाखर अतिशय फायदेशीर आहे. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते.
3 / 10
नारळी साखर - नारळ साखर देखील साखरेचा चांगला पर्याय आहे. हे नारळाच्या झाडामधून निघणारे गोड द्रव्यास तयार करून बनविले जाते. जरी ह्यात साखरे सारखे कॅलोरी असले तरी ग्लायसेमिक इंडेक्स साखरपेक्षा कमी असते. जे आपले शरीर सहज पचवू शकते.
4 / 10
खजूराची साखर - खजूर गोडासाठीचा पर्याय एक उत्तम पर्याय आहे. कोरड्या खजूरांना बारीक करून साखरेऐवजी वापरा. हे चॉकलेट, पेस्ट्री, सांजा, केक किंवा इतरत्र वापरले जाऊ शकते.
5 / 10
जरी ह्याचा वापर चहा, कॉफीमध्ये होऊ शकत नसला तरी ह्याचा वापरामुळे हाडं मजबूत होतात.
6 / 10
गुळामधील जीवनसत्वे आणि खनिजांसह सर्व पोषकद्रव्ये देतात. ह्याचे गुणधर्म उष्ण असल्याने सर्दी आणि पडस्यात फायदेशीर असतात.
7 / 10
त्वचा (Skin) तुकतुकीत राहण्यासाठी गुळ उपयुक्त ठरतो. शरीरातील हानिकारक विषद्रव्ये बाहेर काढून टाकण्यात गूळ मदत करतो त्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते. मुरमांच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर दररोज गूळ खाणे उपयुक्त ठरते.
8 / 10
कच्चा मध - बाजारात मिळणाऱ्या मधाऐवजी कच्चा मध घेणे चांगले असते. मधामध्ये नैसर्गिक स्वरुपात ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असते. ग्लुकोजमुळे शरीराचा थकवा दूर होण्यास मदत मिळते. तर फ्रुक्टोजची शोषण प्रक्रिया धीमी असते, यामुळे ते घटक शरीरात हळूहळू विरघळते आणि दीर्घ काळासाठी शरीराला ऊर्जा प्रदान करते.
9 / 10
हे आपल्याला निव्वळ गोडपणाचं देत नसून वजन पण नियंत्रित ठेवते.
10 / 10
यात पोटॅशियम असते जे स्नायूचा वेदना दूर करण्यास मदत करते. पाचक प्रणाली निरोगी ठेवण्यासाठी – ब्राउन शुगर पाचन तंत्रासाठी फायदेशीर आहे. हे पोटा संबंधित अनेक समस्या दूर ठेवण्यास मदत करते. हे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यात मदत करते.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स