these vegetables eat in winter
थंडीच्या दिवसात 'या' भाज्या खाणं ठरेल फायदेशीर By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 3:13 PM1 / 10भाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. अनेक पोषक घटकांचा समावेश असल्याने आहारात त्याचा समावेश केला जातो. हिवाळा सुरू झाला आहे. या हंगामाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला जास्त भाज्या खायला मिळतात. 2 / 10थंडीच्या दिवसातील वातावरण हे भाज्यांसाठी पोषक असतं. त्यामुळे घरच्या गार्डनमध्ये त्या पिकवता येतात. महिन्याभरात भाजी गार्डनमध्ये तयार होते. थंडीच्या दिवसांत कोणत्या भाज्या खायच्या हे जाणून घेऊया. 3 / 10थंडीत नेहमीपेक्षा स्वस्त आणि ताजे मटार बाजारात दिसतात. मटार खाल्याने स्मरणशक्ती वाढते. याशिवाय तणाव, डिप्रेशन यांसारख्या समस्यांपासून बचाव होतो. 4 / 10गाजर थंडीमध्ये बाजारात अगदी सहज उपलब्ध होतं. अनेक पोषक तत्वांसह अ जीवनसत्त्वानं परिपूर्ण असलेलं गाजर थंडीच्या दिवसांमध्ये नक्की खावं. 5 / 10बीटमध्ये नायट्रेट आणि अनेकप्रकारचे अँटी-ऑक्सिडेंट्स आढळतात. बीटाचा ज्यूस सेवन केल्याने बॉडी डीटॉक्स करण्यास मदत मिळते. याने रक्त शुद्ध होतं आणि लिव्हरही निरोगी राहतं. 6 / 10टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आहे. टोमॅटो त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे. ब्लड शुगर नियंत्रणात राहते तसेच पचन शक्ती चांगली राहते. 7 / 10हिवाळ्यात कांद्याची पात भरपूर येते. त्यामुळे कांद्याची पात खाणे अनेकदृष्टीने फायदेशीर ठरते. कांद्याच्या पातीमधील अँटी-ऑक्सिडेंट्स तत्व डीएनए आणि सेल्स टिशूंचं होणारं डॅमेज रोखते. तसेच व्हिटॅमिन सी कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगरचं प्रमाण कमी करण्यासही मदत करतं. 8 / 10हिवाळ्यात पालकाची भाजी खाणं आरोग्यासाठी आणि डोळ्यांसाठी चांगली मानली जाते. पालकाच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए, सी, आयर्न, मॅगनीज, झिंक, ओमेगा - 3 फॅटी अॅसिड आणि फोलेट ही तत्वे असतात. 9 / 10मुळा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. मुळ्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. मुळ्याची भाजी ही ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवते. मुळ्याच्या भाजीमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात.10 / 10कोबी खाण्याचे अनेक फायदे आहेत. कोबीमध्ये अनेक पोषक घटक आहेत. बद्धकोष्ठता दूर करण्यास कोबी मदत करते. आणखी वाचा Subscribe to Notifications