शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत

By manali.bagul | Published: September 28, 2020 6:38 PM

1 / 9
बदललेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे मोठ्या संख्येनं तरूणांनाही आजारांचा सामना करावा लागतो. अलिकडे करण्यात आलेल्या सर्वेनुसार मागच्या दशकाच्या तुलनेत तरूणांमध्ये कॅन्सरचा धोका ५० टक्क्यांनी वाढला आहे. काही लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास हा धोका वाढत जातो.
2 / 9
कॅन्सर या आजाराची कल्पना करताच खूप भीती वाटते. तरूण वयापासून तुम्ही आहाराच्या सवयी आणि व्यायाम यांकडे अजिबात लक्ष दिलं नाही तर जसजसं वय वाढत जातं तसतसं गंभीर परिणामांचा सामना करावा लागू शकतो. आतडे ही पचन व्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहे.
3 / 9
कोलन स्टूलच्या स्वरुपात कचरा काढून टाकण्यास मदत करतो. मोठ्या आतड्याचा कॅन्सर हा आतड्याच्या आतील आवरणापासून सुरू होऊन पुढे पसरतो. अनेकदा गंभीर स्थिती उद्भवल्यास गाठी तयार होतात. या गाठींमुळे कॅन्सर होऊ शकतो. या कॅन्सरला कोलोरेक्टल कॅन्सर असं म्हणतात.
4 / 9
आतड्यांचा कॅन्सर आणि मुधव्याध याची लक्षणं जवळपास सारखीच आहेत. पोट व्यवस्थित साफ न होणं, गडद रंगाचा मल अशक्तपणा, रक्तस्त्राव होणं, अशी लक्षणं दिसून आल्यास त्वरित तपासणी करणं गरजेचं आहे. कारण वेळीच या आजाराचे निदान झाल्यास आजारापासून लांब राहता येतं. या आजाराबाबत माहिती मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पीटलचे कोलोरेक्टल सर्जन, डॉ. प्रवीण गोरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे.
5 / 9
वयस्कर लोकांनाच नाही तर तरूणांनाही हा आजार होऊ शकतो. त्यासाठी आहार व्यवस्थित न घेणं, नियमित वेळापत्र, व्यस्त जीवनशैली यांमुळे हा आजार वाढत जातो.
6 / 9
कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी आवश्यक व्हिटामीन्स, मिनरल्स आणि अँटिऑक्सिडेंट्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.
7 / 9
व्यायामाला सुरूवात करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. वजन जास्त वाढू देऊ नका.
8 / 9
तंबाखूचं सेवन आणि केमिकली प्रोसेस्ड फूड प्रॉडक्टचं सेवन यामुळेही कॅन्सरचा धोका अनेक पटीने वाढतो. पण जाडेपणा लाइफस्टाइलशी निगडीत एक मोठी समस्या आहे. यामुळेही कॅन्सर होण्याचा धोका अधिक वाढतो.
9 / 9
म्हणून तेलकट, मसालेदार पदार्थांचे सेवन करणं टाळा. घरात जर कोणाला आधी हा आजार झाला असेल तर तुम्हीही वेळोवेळी तपासणी करून आरोग्याची काळजी घेऊ शकता.
टॅग्स :cancerकर्करोगHealthआरोग्यdoctorडॉक्टर