Things to keep in mind while buying copper bottle
तांब्याची बॉटल खरेदी करताय का?; 'या' गोष्टी लक्षात घ्या! By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 2:39 PM1 / 7सध्या कॉपर बॉटल म्हणजेच तांब्याची बॉटल खरेदी करण्याचा ट्रेन्ड वाढला आहे. खरं तर तांब्याच्या बाटलीमधून पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. असं मानलं जातं की, तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत राहते, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते, त्वचेचं तारूण्य टिकतं तसेच इन्फेक्शनपासूनही बचाव होतो. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तांब्याची बॉटल किंवा जार खरेदी करताना तुम्ही प्युअर कॉपर म्हणजेच शुद्ध तांब्याची बॉटल खरेदी करत आहात ना?; ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक असतं. 2 / 7बाजारात अनेक तांब्याच्या बॉटल्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पण त्यातून योग्य बॉटल निवडणं कठिण असतं. आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही योग्य कॉपर बॉटल निवडू शकता. 3 / 7तांब्याची बॉटल खरेदी करताना त्यावरील ऱ्हॅपर किंवा बॉक्सवर लिहिलेली माहिती व्यवस्थित वाचा. जर त्यावर लिहिलेलं असेल की, तांब्यासोबत दुसरा एखादा धातू एकत्र केला गेला आहे, तर ती बॉटल खरेदी करू नका. 4 / 7तुम्ही जी बॉटल खरेदी केली आहे ती तांब्याचीच आहे, हे ओळखण्यासाठी त्यावर लिंबू लावा आणि त्यानंतर धुवून टाका. त्याची शाइन तशीच राहिली तर ती तांब्याचीच आहे. 5 / 7तांब्याची बॉटल किंवा जारचं तोडं मोठं असणं गरजेचं आहे. वापरण्यानुसार तांबं काळं पडतं. अशातच ते वेळोवेळी स्वच्छ करण्याची गरज असते. जर बॉटलचं तोंड लहान असेल तर स्वच्छ करता येणार नाही. 6 / 7तांब्याची बॉटल तुम्ही दुकानातून खरेदी करा किंवा ऑनलाईन खरेदी करा. खरेदी करताना खोट्या विक्रेत्यांपासून दूर राहा. 7 / 7अनेक तांब्याच्या बॉटल्समध्ये आतमध्ये काच किंवा दुसऱ्या धातूचा वापर करण्यात आलेला असतो. अशी बॉटल खरेदी करू नका. तांब्याची बॉटल पूर्णपणे तांब्यापासूनच तयर केलेली असाव. त्यामध्ये दुसऱ्या कोणत्याही धातूचा वापर करण्यात आलेला नसावा. आणखी वाचा Subscribe to Notifications