शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

थायरॉइडचे टेन्शन; तपासणी केली का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 1:22 PM

1 / 5
अनेकदा महिला घसादुखीच्या किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष करतात; मात्र या तक्रारी पुढे गंभीर स्वरूप धारण करण्याचा धोका असतो. थायरॉइडचा विकार प्रामुख्याने स्त्रियांमध्ये आढळतो, त्वरित निदान व उपचारांनी नियंत्रण मिळविणे शक्य असते.
2 / 5
थायरॉइडचे विकार होण्याची कारणे गुंतागुंतीची असू शकतात; परंतु काही पथ्य पाळल्यास होऊ घातलेले थायरॉइड विकार टाळता येतात. त्यासाठी आहार, व्यायाम आणि वैद्यकीय सल्ला ही त्रिसूत्री आहे. - डॉ कांचन बाफना, कान-नाक-घसा तज्ज्ञ
3 / 5
थायरॉइड झाल्यास मानेचा खालच्या भागात सूज येते आणि गाठ निर्माण होते. मिठाचे प्रमाण,लठ्ठपणा यातून थायरॉइड उद्भवते.
4 / 5
चेहऱ्यावर सूज येणे , वजन वाढत जाणे, पोट साफ न होणे, त्वचा खरखरीत होणे, ऐकू कमी येणे, उंची न वाढणे, हालचालीमध्ये संथपणा , उशिरा वयात येणे.
5 / 5
नियमित औषधी घ्यावीत. डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय औषध बंद किंवा पॉवर कमी करू नये .नियमित तपासणी करावी. रक्तातील साखरेची चाचणी करावी.