शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

घरातील झुरळ पळवण्यासाठी करा हे घरगुती उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 11:29 AM

1 / 5
तेजपत्ताच्या सुगंधाने झुरळं बाहेर पळतात. घरातील ज्या कोपऱ्यात झुरळ अधिक प्रमाणात असतात त्याठिकाणी तेजपत्त्याची काही पाने बारीक करुन ठेवा. तेजपत्ते बारीक केल्यावर तुमच्या हाताला तेल लागल्याचे दिसेल. याच तेलाचा सुगंध झुरळांना पळवून लावतो. ही पाने काही दिवसांनी बदलत रहावी.
2 / 5
एका वाटिमध्ये समान प्रमाणात बेकिंग पावडर आणि साखर मिश्रित करा. साखरेचा गोडव्याकडे झुरळं आकर्षित होतात. आणि बेकिंग सोड्यामुळे ते मारले जातात. (Image Credit : Nuts.com)
3 / 5
झूरळाला घरातून पळवून लावण्यासाठी लवंगचा फार फायदा होतो. ज्या ज्या जागांवर झुरळं येतात त्या ठिकाणी काही लवंग ठेवाव्यात. लवंगेच्या उग्र दर्पामुळे झुरळं घरातून पळतात.
4 / 5
बोरिक पावडर घरातील काही जागांवर टाकल्यास झुरळं घरातून पळ काढतात. पण हे पावडर टाकताना काळजी घेणे गरजेचे आहे. घरातील लहान मुलांना या पावडरपासून दूर ठेवा.
5 / 5
केरोसिनचा वापर करुनही घरातील झुरळं पळवून लावता येतात. पण याच्या वासाने तुम्हालाही त्रास होऊ शकतो.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सMonsoon Specialमानसून स्पेशल