शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बदलणाऱ्या वातावरणामध्ये अशी घ्या स्वतः ची आणि कुटुंबाची काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 2:57 PM

1 / 7
वातावरणात सातत्याने बदल होत असतात. कधी गरम तर कधी थंड तापमान असे बदल हे सध्या वातावरणात होत असलेले दिसून येत आहेत. मात्र अशा वातावरणात आजारी पडण्याची शक्यता ही अधिक असते. अशा वेळी आपली आणि आपल्या कुटुंबीयांची कशी काळजी घेताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात हे जाणून घेऊया.
2 / 7
कपड्यांबाबत अधिक जागृत असणं गरजेचं आहे. ऑफिस आणि घरी एसी तर बाहेर कडक ऊन अशा वातावरणाचा शरिरावर वाईट परिणाम होतो. उन्हाळ्यात सूती कपडे वापरले जातात. तसेच घराबाहेर पडताना याबाबत विशेष काळजी घ्या.
3 / 7
अनेकांना थंड पेय अथवा पदार्थ खाण्याची सवय असते. मात्र त्यांची ही सवय त्यांना महागात पडू शकते. उन्हाळ्यात थंड पदार्थ खायला सर्वांनाच आवडतं मात्र यामुळे आजारी पडण्याचा धोका हा अधिक असतो.
4 / 7
रणरणत्या उन्हात आईस्क्रिम खाण्याची मजाच काही और आहे. मात्र अशा वातावरणात आईस्क्रिम खाल्ल्यास घशावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते.
5 / 7
शरीराला पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या.
6 / 7
निरोगी आरोग्यासाठी योग्य आहार खूप गरजेचा असतो. उन्हाळ्यात तापमानात वाढ झाल्याने घरी तयार केलेले अन्न पदार्थ खा. तेलकट, तिखट पदार्थ खाणं शक्यतो टाळा.
7 / 7
अनेकदा आजारी पडल्यावर त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. मात्र असं करू नका आरोग्याची नीट काळजी घ्या. उन्हाचा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार करा.
टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स