Top 5 Magnesium rich content foods to keep muscles strong and nerves healthy
स्नायू मजबूत अन् नसा निरोगी ठेवतं 'मॅग्नेशियम'; दररोज खा पोषक द्रव्य असलेले 'हे' 5 पदार्थ By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 2:11 PM1 / 6Top 5 Magnesium Rich Food Options: शरीरातील पोषक तत्वांमध्ये लोह, कॅल्शियम, प्रथिने किंवा फायबर यांच्यासोबतच मॅग्नेशियम हा घटकही महत्त्वाचा असतो. शरीरातील अनेक मानसिक प्रक्रिया व शरीरातील स्नायू तयार करण्याचे आणि नसा निरोगी ठेवण्याचे काम हाच घटक करतो. पुढील पाच गोष्टींचे रोज सेवन केल्याने तुमच्या शरीरात कधीही मॅग्नेशियमची कमी भासणार नाही.2 / 6बदाम खाल्ल्याने दैनंदिन गरजेच्या २०% (७६ मिलीग्राम) मॅग्नेशियम मिळते. दररोज मूठभर बदाम खाणे हा रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचा आणि मॅग्नेशियम मिळण्याचा एक उत्तम मार्ग आहे.3 / 6भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम जास्त असते, जे बहुतेक लोकांना त्यांच्या आहारातून पुरेसे मिळत नाही. प्रत्येक 100 ग्रॅम भोपळ्याच्या बियांमध्ये 262 मिलीग्राम मॅग्नेशियम असते. हे तुमच्या दैनंदिन मॅग्नेशियमच्या 65% गरज पूर्ण करण्यासाठी पुरेशी आहे.4 / 6हे पोटॅशियम युक्त आणि हृदयासाठी निरोगी आणि हाडे मजबूत करणारे फळ आहे. एक मध्यम केळी 10.3 मिलीग्राम व्हिटॅमिन सी आणि 32 मिलीग्राम मॅग्नेशियम देखील प्रदान करते.5 / 6एक कपभर कच्च्या पालकामध्ये २४ मिलीग्राम मॅग्नेशियम १९ असते. पण शिजवलेल्या पालकामध्ये 157 मिलीग्राम मॅग्नेशियम असते. पालक देखील लोहाचा उत्तम स्रोत आहे. आपण ते हलके शिजवावे आणि खावे.6 / 6काजू हे मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असलेले ड्रायफूट आहे. 100 ग्रॅम कच्च्या काजूच्या सेवनाने 251 मिलीग्राम मॅग्नेशियम मिळते. याशिवाय, हे ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि प्रथिनेचा एक उत्तम स्रोत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications