शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोरोना काळात प्रवास करावा लागतो? मग व्हायरसपासून बचावासाठी वापरा 'या' टिप्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 3:22 PM

1 / 11
कोरोना व्हायरसचं संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरात 1 कोटींपेक्षा अधिक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली. भारत तर आता चौथ्या स्थानावर आलाय. अशात अजूनही लोक विनाकारण बाहेर पडताना दिसतात. काही ठिकाणी नियम शिथिल करण्यात आले. त्यामुळे अनेकजण प्रवास करू लागले आहेत. अशांना कोरोनाचा अधिक धोका आहे. (Image Credit : Outlook)
2 / 11
कोरोना रूग्णांची वाढती संख्या बघता हे लक्षात येऊ शकतं की, कोरोना व्हायरसचं संक्रमण किती वेगाने पसरत आहे. पण दैनंदिन जीवन तर लोक रोखू शकत नाहीत. त्यामुळे तुम्हीही काही कामानिमित्त प्रवास करत असाल किंवा ऑफिसला जात असाल तर कोरोनाची लागण होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल हे आम्ही सांगणार आहोत.
3 / 11
- लॉकडाऊनमध्ये सूट मिळाल्यावर जास्तीत ठिकाणांवर काही नियमांसोबत प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे. पण या परवानगीचा वापर फार समजदारी करण्याची गरज आहे. कारण आपला जरासा निष्काळजीपणा आपल्या अंगाशी येऊ शकतो.
4 / 11
- जर तुमच्या बाजूच्या सीटवर कुणी सर्दी-खोकला असलेली व्यक्ती बसलेली असेल तर लगेच सीट बदला. जर असं करणं शक्य नसेल तर त्या व्यक्तीशी बोलू नका आणि आपला मास्क व्यवस्थित लावा.
5 / 11
- जेव्हाही हात चेहऱ्याला लावायचे असतील किंवा कोणत्या साहित्याला स्पर्श करायचा असेल तर आधी हात सॅनिटायजरने स्वच्छ करा.
6 / 11
- अशात जर तुम्हाला सर्दी किंवा ताप असेल किंवा खोकला असेल तर अजिबात प्रवास करू नका. अशा स्थिती तुमचं प्रवास न करणं हे तुमच्यासाठी आणि तुमच्यासोबत प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी गरजेचं आहे.
7 / 11
- जर तुम्हाला काही समस्या असेल तरी तुम्ही प्रवास करत असाल आणि तुमच्या जवळून कुणी संक्रमित व्यक्ती गेली तर तुम्हालाही लागण होण्याचा धोका अधिक असू शकतो. कारण तुमचं शरीर आधीच सर्दी, खोकला आणि तापाने कमजोर झालेलं असतं. अशात कोरोना व्हायरसला तुमच्या शरीरात शिरण्यासाठी योग्य वातावरण मिळतं.
8 / 11
- तसेच प्रवासादरम्यान काय खावं काय खावू नये असेही प्रश्न आहेत. अशात घरातून जेवण करूनच बाहेर पडलेलं बरं. बाहेरचं खाणं टाळा किंवा सोबत घेतलेलंही बाहेर सार्वजनिक ठिकाणी खाणं टाळा. पाणी सुद्धा घरूनच सोबत ठेवा.
9 / 11
- जर रस्त्यात पाण्याची बॉटल घेत असाल तर आधी बॉटल योग्यप्रकारे सॅनिटाइज करा. जेणेकरून संक्रमणाचा धोका कमी केला जावा. या काळात पॅक्ड फूड किंवा प्लास्टिक रॅपिंग फूड खाणे पूर्णपणे टाळावे.
10 / 11
- प्रवासादरम्यान तुम्हाला ठिकठिकाणी ट्रॅफिक पोलीस किंवा सिव्हिल पोलीस तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारू शकतात. अशात त्यांना पूर्ण प्रतिसाद द्या. कारण ते हे आपल्या सुरक्षेसाठीच विचारत आहेत.
11 / 11
- घराबाहेर पडताना सोबत एक्स्ट्रा मास्क नक्की ठेवा. तसेच पेपर सोप, सॅनिटायजर, टिश्यू पेपरही सोबत असू द्या.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स