Trump administration selects five coronavirus vaccine candidates as finalists
कोरोनाच्या ५ लसींवर अमेरिकेने दाखवला विश्वास; 'या' महिन्यात येऊ शकते कोरोनाची लस By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 10:25 AM1 / 10अमेरिकेतील प्रशासनाने कोरोना विषाणूंची लस तयार करण्याासाठी पाच संभाव्य कंपन्यांची निवड केली आहे. न्यूयॉर्क टाईम्सने प्रकाशित केलेल्या माहितीनुसार या कंपन्यांमध्ये मॉडर्ना इंक, एस्ट्राजेनेका पीएलसी, फाइजर इंक, जॉन्सन एंड जॉन्सन आणि मर्क एंड को इंक यांचा समावेश आहे. 2 / 10रिपोर्टनुसार प्रशानाने निवडलेल्या या कंपन्यांकडून सरकराला अतिरिक्त फंड या व्यतिरिक्त क्लिनिकल ट्रायल, लॉजिस्टिकल आणि आर्थिक स्वरूपातून साहाय्य मिळणार आहे. अद्याप कोरोनाच्या कोणत्याही लसीला किंवा औषधाला मान्यता मिळालेली नाही. 3 / 10रिपोर्टमधील फ्रेंच औषध निर्मिती करणारी कंपनी सनोफी, नोवामॅक्स इंक आणि फार्मास्यूटिकल्स इंक यांनी अद्याप संभाव्य लसीबाबत उल्लेख केलेला नाही. जगभरातून सध्या १०० पेक्षा जास्त लसींवर काम सुरू करण्यात आलं आहे. 4 / 10पुढच्या काही दिवसातच व्हाईट हाऊसमध्ये निर्णयाची घोषणा केली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप या विषयावर व्हाईट हाऊसने कोणतीही माहिती दिलेली नाही. अमेरिकेतील आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या लसींबाबत विचार सुरू आहे. 5 / 10या यादीत समाविष्ट असलेल्या कंपनींची उत्पादन क्षमता चांगली आहे. तसंच मोठ्या प्रमाणावर क्लिनिकल ट्रायलसाठी योजना तयार केल्या जात आहेत. यात १ लाखापेक्षा जास्त वॉलेंटिअर्सचा समावेश असेल. 6 / 10अमेरिका या वर्षीच्या शेवटापर्यंत कोरोना विषाणूंची प्रभावी लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी जुलैमध्ये या लसींचे मधल्या टप्प्यातील चाचणी पूर्ण होईल. 7 / 10National Institutes of Health चे डायरेक्टर डॉक्टर फ्रांसिस कोलिन्स यांनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार मधल्या टप्प्यातील ट्रायल सुरू करण्यासाठी पहिल्या दोन लसी या मॉडर्ना आणि एस्ट्राजेनेका ऑक्सफोर्ड यूनिव्हरसिटीच्या असू शकतात. 8 / 10National Institutes of Health चे डायरेक्टर डॉक्टर फ्रांसिस कोलिन्स यांनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार मधल्या टप्प्यातील ट्रायल सुरू करण्यासाठी पहिल्या दोन लसी या मॉडर्ना आणि एस्ट्राजेनेका ऑक्सफोर्ड यूनिव्हरसिटीच्या असू शकतात. 9 / 10National Institutes of Health चे डायरेक्टर डॉक्टर फ्रांसिस कोलिन्स यांनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार मधल्या टप्प्यातील ट्रायल सुरू करण्यासाठी पहिल्या दोन लसी या मॉडर्ना आणि एस्ट्राजेनेका ऑक्सफोर्ड यूनिव्हरसिटीच्या असू शकतात. 10 / 10National Institutes of Health चे डायरेक्टर डॉक्टर फ्रांसिस कोलिन्स यांनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार मधल्या टप्प्यातील ट्रायल सुरू करण्यासाठी पहिल्या दोन लसी या मॉडर्ना आणि एस्ट्राजेनेका ऑक्सफोर्ड यूनिव्हरसिटीच्या असू शकतात. आणखी वाचा Subscribe to Notifications