Unhealthy blood vessels treatment cure home remedies foods
कमजोर नसांमुळे वाढेल हार्ट अटॅकचा धोका, जाणून घ्या नसा मजबूत करण्याचे सोपे उपाय! By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2022 11:14 AM1 / 7How To Make Blood Vessels Healthier: आपलं शरीर अनेक प्रकारच्या धमण्या आणि नसांपासून तयार झालं आहे. शरीरातील या ब्लड वेसल्स हृदयापासून रक्त टिश्यूजपर्यंत नेण्याचं काम करतात. हेच कारण आहे की, एका हेल्दी बॉडीसाठी शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे रक्तवाहिन्यांचीही काळजी घेणं गरजेचं आहे. हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, नसा गरम आणि लवचीक असतात. ज्यातून रक्त सहजपणे वाहून नेलं जातं. या नसा कमजोर होऊ नये म्हणून काही चांगल्या सवयी लावल्या पाहिजे.2 / 7कमजोर नसांमुळे हार्ट अटॅक - जर नसांची योग्य ती काळजी घेतली गेली नाही तर यात अडथळे निर्माण होतात आणि त्या कमजोर होऊ लागतात. अशात वेगवेगळ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. अनेक नसा मोठ्या आणि कठोर झाल्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. एक्सपर्ट सांगतात की, नसा आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला फिजिकली अॅक्टिव रहायला हवं. सोबतच हेल्दी डाएट फॉलो करावी.3 / 7फायबर असलेले पदार्थ - फायबर भरपूर प्रमाणात असलेल्या पदार्थांचं सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. कोलेस्ट्रॉल धमण्या खराब होण्याचं एक मोठं कारण आहे. तुम्ही तुमच्या आहारात कडधान्याचा समावेश करावा. चीप्स, गोड कॅंडीऐवजी फळांचं आणि भाज्यांचं सेवन करावं.4 / 7हिरव्या पालेभाज्या - हिरव्या पालेभाज्या या रक्ताच्या नसांसाठी फायदेशीर मानल्या जातात. एक्सपर्ट सांगतात की, तुम्ही तुमच्या आहारात वेगवेगळ्या रंगाच्या फळं-भाज्यांचा समावेश करून नसांचं आरोग्य चांगलं ठेवू शकता. पालेभाज्यांमध्ये बायोफ्लेवोनोइड्स फायटोन्यूट्रिएंट्स आढळतात. ज्याने ब्लड सर्कुलेशनमध्ये सुधार होतो. यासोबतच यात ओमेगा-3 फॅटी अॅसिड आढळतं. ज्याने नसा मजबूत होतात.5 / 7लाल मिरच्या आणि हळदीचं सेवन - नसा मजबूत करण्यासाठी मसाले तुमची मदत करू शकतात. हळदीमध्ये अॅंटी इफ्लेमेटरी गुण असतात, जे धमण्या कठोर होण्यापासून रोखतात. तेच लाल मिरच्या सर्कुलेशनला एक्साइट करतात. याने रक्तप्रवाह सुरळीत होतो.6 / 7कमी प्रमाणात खा मीठ - तुम्हाला नसा हेल्दी ठेवायच्या असतील तर सोडिअमचं प्रमाण कमी करा. हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, नसांचं आरोग्य कायम ठेवण्यासाठी खाण्यात सोडिअमचं प्रमाण कमी असायला हवं. यासाठी तुम्ही प्रोसेस्ड किंवा आधीच शिजवलेल्या किंवा आधीच पॅक केलेले पदार्थ खाणं टाळावं. कारण यात सोडिअम जास्त असतं. 7 / 7पाण्याचं सेवन - हेल्दी राहण्यासाठी शरीरात पाण्याची फार गरज असते. शरीरात साधारण 93 टक्के पाणी असतं. नसा चांगल्या ठेवण्यासाठी एका दिवसात 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला हवं. याने डिहायड्रेशन होणार नाही आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतील. आणखी वाचा Subscribe to Notifications