शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शरीरातल्या 'या' अवयवांशिवायही अगदी व्यवस्थित जगू शकतो माणूस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 2:49 PM

1 / 8
शरीरातल्या सर्व अवयवांचं काम सुरळीत असेल तरच माणूस चांगलं आयुष्य जगतो. त्यामुळेच सर्व अयवयांची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र माणसाच्या शरीरात असेही काही अवयव आहेत, ज्यांचा माणसाला फारसा उपयोग नाही.
2 / 8
अ‍ॅपेंडिक्सच्या ऑपेरेशनबद्दल तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. जास्त सेल्युलोज असलेले पदार्थ पचवण्याचं काम अ‍ॅपेंडिक्स करतं. मात्र अ‍ॅपेंडिक्स पचन संस्थेचा भाग नाही.
3 / 8
अक्कल दाढ काढताना अतिशय त्रास होतो. मात्र या दाढेचा आता फारसा वापर होत नाही. प्राचीन काळी माणूस कच्चे पदार्थ खात असल्यानं अक्कल दाढ उपयोगी ठरायची. मात्र आता जेवण व्यवस्थित शिजवून खाल्लं जास्त असल्यानं अक्कल दाढ फारशी वापरली जात नाही.
4 / 8
मानवी त्वचेत अरेक्टर पिली नावाच्या मांसपेशी असतात. यामुळेच शरीरावर शहारे येतात. पूर्वीच्या काळी इन्सुलेशनसाठी या मांसपेशीचा वापर व्हायचा. आता ती फारशी उपयोगी ठरत नाही.
5 / 8
माणसाच्या विकासाची प्रक्रिया फार मोठी आहे. या प्रक्रियेत माणूस चालायला शिकला. त्यामुळे शेपटीचं हाड आता माणसासासाठी उपयोगशून्य आहे.
6 / 8
कानात काही मांसपेशी लपलेल्या असतात. कानामागच्या बाहेरील भागावर नियंत्रण ठेवण्याचं काम या मांसपेशी करायच्या. मात्र आता माणसानं या मांसपेशीचा वापर करण्याची क्षमता गमावली आहे.
7 / 8
मानवी शरीरात पलमारिस लॉन्गस नावाच्या मांसपेशी असतात. त्या पकड निर्माण करण्याचं काम करतात. मात्र या मांसपेशीशिवायही पकड निर्माण करणं सहज शक्य आहे.
8 / 8
डोळ्यांच्या कोपऱ्यात प्लिका सेमिलुनारिस असतं. याला तिसरा डोळादेखील म्हटलं जातं. मात्र माणसाच्या शरीरातील पेशी प्लिका सेमिलुनारिस नियंत्रण करण्यात सक्षम नाहीत. त्यामुळे त्यांचा वापरदेखील होत नाही.