शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तांब्याची भांडी वापरणं आरोग्यासाठी उत्तम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 10:39 AM

1 / 7
तांब्याच्या भांड्यात ८-१० तास ठेवलेले पाणी प्यायल्याने कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते आणि हृदयाची क्षमता वाढते.
2 / 7
पित्त, अल्सर किंवा पोटात गॅसचा विकार होणार्‍यांसाठी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिणे अत्यंत हितकारी आहे.
3 / 7
नेहमी तरुण दिसण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे लाभदायक आहे. यामुळे डेड स्किन (मृत त्वचा) निघून जाते व चेहरा नेहमी उजळ दिसतो.
4 / 7
दररोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास यामधील कॉपर रक्ताची कमतरता दूर करेल. यामुळे अॅनिमियाचा धोका टळतो.
5 / 7
रोज सकाळ - संध्याकाळ तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे, यामुळे सांधेदुखीच्या वेदना कमी होतील आणि आराम मिळेल.
6 / 7
तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स पर्याप्त प्रमाणात असतात, जे कॅन्सरशी लढण्यात सहायक ठरतात. यामुळे कॅन्सरचा धोका कमी राहतो.
7 / 7
अ‍ॅसिडिटी,गॅस किंवा पोटाची दुसरी समस्या असेल तर तांब्याच्या भांड्यातील पाणी अमृतासमान काम करते. आयुर्वेदानुसार जर तुम्हाला शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर काढण्याची इच्छा असेल तर तांब्याच्या भांड्यात कमीत कमी 8 तास ठेवलेले पाणी प्यावे. यामुळे पाचन क्रिया व्यवस्थित राहते.
टॅग्स :Healthआरोग्य