शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

डायबिटीजच्या रुग्णांसाठी 'हा' आहार फायदेशीर, जाणून घ्या तज्ज्ञांकडून...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 2:35 PM

1 / 8
गेल्या काही काळापासून डायबिटीजच्या (मधुमेह) रुग्णांची संख्या वाढत आहे. लॅन्सेट या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या आयसीएमआर (ICMR) रिसर्चनुसार, भारतातील जवळपास १३.६ कोटी लोकसंख्या प्री-डायबिटीक आहे. २०२३ मध्ये भारतात डायबिटीजच्या रुग्णांची संख्या १० कोटींहून अधिक होती.
2 / 8
डायबिटीज होण्याचे कारण म्हणजे खराब लाईफस्टाईल आणि खाण्याच्या सवयी आहेत. टीव्ही ९ ने दिलेल्या वृत्तानुसार, न्यूट्रिशनिस्ट नमामी अग्रवाल म्हणतात की, डायबिटीज रुग्णांसमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्यांच्या रक्तातील शुगर कंट्रोल करणे.
3 / 8
डायबिटीजच्या रुग्णांनी दररोज ३० मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय, अनेक संशोधनांमध्ये असे समोर आले आहे की, व्हीगन डाएट डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतो. दरम्यान, व्हीगन डाएटला शुद्ध शाकाहारी अन्न म्हणूनही ओळखले जाते. व्हीगन डाएटचे पालन करणारे लोक दुग्धजन्य पदार्थ खात नाहीत.
4 / 8
व्हीगन डाएटमध्ये मांस, मासे, दूध, दही, तूप, पनीर, डेअरी प्रोडक्ट आणि मध यासारख्या कोणत्याही खाद्यपदार्थांचा समावेश नसतो. व्हीगन डाएटमध्ये फक्त झाडे आणि वनस्पतींपासून मिळणारी फळे, भाज्या, धान्ये, नट्स इत्यादींचा समावेश असतो.
5 / 8
व्हीगन डाएटमध्ये पोषक तत्वे पुरेशा प्रमाणात आढळतात. हे आपल्या शरीरातील इन्सुलिन लेव्हल मॅनेज करण्यास मदत करते. तज्ज्ञांच्या मते, व्हीगन डाएट आपल्या शरीरातील ग्लुकोजची पातळी देखील नियंत्रित करते. यामुळे रक्तातील शुगर नियंत्रणात राहते.
6 / 8
न्यूट्रिशनिस्ट नमामी अग्रवाल म्हणतात की, ज्या लोकांचे ब्लड शुगर नेहमी वाढत असते. त्यांनी कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खावेत. आपल्या आहारात शक्यतो हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. कारली, दुधीभोपळा, भेंडी या भाज्या डायबिटीजच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानल्या जातात.
7 / 8
हिरव्या भाज्या खाण्यासोबतच व्यायाम करायला विसरू नये. व्यायामामुळे रक्तातील साखरही नियंत्रणात राहते. जर तुम्ही जड व्यायाम करत नसाल तर रोज अर्धा तास चालण्याची सवय लावावी.
8 / 8
Disclaimer: दरम्यान, याठिकाणी देण्यात आलेली माहिती केवळ केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने दिली आहे. त्यामुळे आपल्याला काही प्रश्न किंवा समस्या असल्यास नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेह