Vegetables you should never store in the fridge onion tomato garlic cucumber
फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका या भाज्या, आरोग्याचं होईल मोठं नुकसान; कसं ते जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 11:04 AM1 / 7भाज्या किंवा फळं फ्रेश ठेवण्यासाठी नेहमीच लोक फ्रिजचा वापर करतात. ज्या लोकांकडे रोज भाजी किंवा फळं आणण्याचा वेळ नसतो ते लोक फ्रिजमध्ये आणून ते ठेवतात. फ्रिजमध्ये या गोष्टी बराच वेळ फ्रेश राहतात. पण एक्सपर्ट सांगतात की, काही फळ आणि भाज्या फ्रिजमध्ये ठेवणं टाळलं पाहिजे. जर ही फळं किंवा भाज्या फ्रिजमध्ये ठेवल्या तर फूड पॉयजनिंग धोका वाढू शकतो. चला जाणून घेऊ अशा भाज्यांबाबत ज्या फ्रिजमध्ये ठेवू नयेत.2 / 7काकडी - काकडी ही एक फळभाजी आहे. कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर अॅन्ड एन्वायर्नमेंटल सायन्सेजनुसार, जर काकडी 10 डिग्री सेल्सिअसखाली तीन दिवसांपेक्षा जास्त काळ ठेवलं तर त्या वेगाने सडू लागतात. त्यामुळे काकडी फ्रिजमध्ये ठेवणं टाळा. फ्रिजऐवजी काकडी उन्हापासून दूर नॉर्मल ठिकाणी ठेवा.3 / 7तज्ज्ञांनुसार, काकडी अॅवोकाडो, टोमॅटो किंवा कलिंगडसारख्या फळांजवळही ठेवू नये. याचं कारण असे फळ पिकताना एथिलीन गॅस सोडतात आणि काकडी त्या गॅसच्या संपर्कात येण्याने लवकरच पिवळी होते. 4 / 7टोमॅटो - तज्ज्ञांनुसार, टोमॅटो नेहमीच रूम टेम्प्रेचरवर स्टोर करावं. फ्रिजमध्ये ठेवल्याने टोमॅटोची टेस्ट, बनावट आणि सुगंध प्रभावित होतो. त्यामुळे टोमॅटो थंड आणि अंधाऱ्या जागी सूर्यापासून दूर ठेवा. खिडकीतून येणारे गरम सूर्यकिरणं टोमॅटोची पिकण्याची प्रोसेस वेगाने करतात. फ्रिजऐवजी टोमॅटो बाहेर जास्त दिवस चांगले राहतात.5 / 7कांदे - नॅशनल कांदे असोसिएशननुसार, कांदे नेहमी थंड, कोरड्या, अंधाऱ्या आणि हवेदार ठिकाणी ठेवावे. कारण कांदे सहजपणे ओलावा पकडतात. जर तापमान किंवा आर्दता जास्त असेल तर कांद्यांना कोंब येतात आणि कांदे सडू लागतात. जर कांदे थंड रूमच्या टेम्प्रेचरमध्ये ठेवले तर दोन महिन्यांपेक्षा जास्त चांगले राहतात.6 / 7बटाटे - कच्चे बटाटे एका मोकळ्या टोपलीत ठेवणं कधीही चांगलं असतं. हे फ्रिजमध्ये ठेवणं टाळा. थंड तापमानात बटाट्यात आढळणारं स्टार्चयुक्त कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटला बदलतं आणि भाजी करताना बटाट्याची चव गोड होते. त्यामुळे ते फ्रिजमध्ये ठेवणं टाळा. त्याची भाजी करून तुम्ही ती फ्रिजमध्ये ठेवू शकता.7 / 7लसूण - लसूणही फ्रिजमध्ये ठेवू नये. कारण हेही लवकर मॉइश्चर अब्जॉर्ब करतात. त्यामुळे त्यांनाही कांद्याप्रमाणे थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवावे. सोबतच त्यांना हवेची गरज अससते. त्यांना पिवशी बंद करून ठेवू नका. आणखी वाचा Subscribe to Notifications